महिला पदाधिकारी विनयभंग प्रकरण : वाहतूक सेनेचा प्रदेशाध्यक्ष पोलिसांना सापडेना!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 09:19 PM2019-09-09T21:19:24+5:302019-09-09T21:21:26+5:30
माहेश्वरी अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते.
मुंबई : महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग करणारा शिवसेना प्रणित वाहतूक सेनेचे राज्य अध्यक्ष दीपक माहेश्वरी आरसीएफ पोलिसांना मिळेना झाला आहे. गणेशोत्सवाच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याने त्याला अटक करण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाही. त्यामुळे माहेश्वरी अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते.
संबंधित महिला पदाधिकारी ही पतीशी पटत नसल्याने ९ वर्षाच्या मुलासमवेत आई-वडीलांकडे रहाते. दीपक माहेश्वरीने तिला २५ मे रोजी त्यांनी तिची प्रदेश कार्यकारिणीत महत्वाच्या पदावर नियुक्ती केली. त्यानंतर २८ मे पासून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करु लागला. ६ जुनला एका कार्यक्रमाच्या जाण्यासाठी बोलावून गाडीत बसविले. त्यावेळी तिच्याशी शारीरिक छेडछाड केली. त्यानंतर पुन्हा अन्य पदाधिकाऱ्याच्यामार्फत तडजोड करण्यासाठी बोलाविले. त्यावेळी अश्लील शिवीगाळ करीत संबंध न ठेवल्यास गँगस्टरना सुपारी देवून तुझा मर्डर करु असे धमकाविले. याप्रकरणी तक्रार अर्ज दिल्यानंतरही तो मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचे त्याने फिर्यादीत म्हटले आहे. शुक्रवारी रात्री याबाबत आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत त्याला अटक झालेली नाही.