आधी बालपणीच्या मित्राच्या पत्नीला पळवलं नंतर मुलीवरही टाकली वाईट नजर....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 01:51 PM2021-02-04T13:51:04+5:302021-02-04T13:56:54+5:30
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, तो एका म्युचुअल फंड कंपनीत काम करतो. २०१० मध्ये त्याचं लग्न मोतीपूरमधील तरूणीसोबत झालं होतं.
बिहारच्या मुजफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीवर मित्राची पत्नी पळवून नेण्याचा आरोप आहे. सोबत तक्रारीनुसार तो व्यक्ती प्रेयसीच्या मुलीवरही वाईट नजर ठेवत होता. याप्रकरणी त्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मुजफ्फरपूरच्या काजीमोहम्मदपूर भागातील ही घटना आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, आधी आरोपीने मित्राची पत्नी पळवून नेली. त्यानंतर त्याने चौथ्या वर्गात शिकत असलेल्या मुलीलाही आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. आरोपीचं नाव रंजीत कुमार असून तो चंपारणचा राहणारा आहे. (हे पण वाचा : बोंबला! ३१ लाख खर्च करून पत्नीला कॅनडाला पाठवलं, पोहचल्यावर म्हणाली - 'फोन केला तर केस करेन')
यादरम्यान मुलीची मेडिकल टेस्ट केली आहे आणि प्रकरणाची गंभीरता बघता केस महिला पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन टीम तयार केल्या आहेत. आरोपी लवकरच पकडला जाणार अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीये.
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, तो एका म्युचुअल फंड कंपनीत काम करतो. २०१० मध्ये त्याचं लग्न मोतीपूरमधील तरूणीसोबत झालं होतं. त्यांना दोन मुलंही आहेत. ज्याच्यावर आरोप आहे तो सुद्धा त्याच गावात राहणारा आहे. (हे पण वाचा : बॉयफ्रेन्डच्या मदतीने पतीला जिवंत जाळलं, मित्रानेच फोन करून विटांच्या भट्टीवर बोलवलं होतं...)
आश्चर्याची बाब म्हणजे महिलेचा पती आणि आरोपी दोघेही एकत्र शिकले. आणि एकाच ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला होता. यादरम्यान आरोपीने मित्राच्या पत्नीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यावरून पती-पत्नीमध्ये भांडण होत होतं.
त्यानंतर गेल्यावर्षी सप्टेंबरपासून दोन्ही मुलं घेऊन महिला वेगळी राहत होती. तिथे आरोपीचं येणं-जाणं होतं. ही महिला एका खाजगी शाळेत शिकवते. आरोप आहे की, यादरम्यान आरोपीने तिच्या मुलीवरही वाईट व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता.
तक्रारीनुसार, आरोपी तिच्यासोबत जबरदस्ती करत होती. ती कशीतरी स्वत:ला वाचवत तेथून पळाली. ती रडत रडत वडिलांच्या घरी पोहोचली आणि हा सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर तो आपल्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेला.