उल्हासनगरात पठाणी व्याजाला त्रस्त होऊन महिलेने संपवले जीवन?; पीडितेने दिले होते निवेदन

By सदानंद नाईक | Published: September 15, 2023 07:17 PM2023-09-15T19:17:00+5:302023-09-15T19:19:48+5:30

तू मेली तरी तुझ्या पती व मुलांकडून वसूल करेल, अशी धमकी दिली.

Woman's suicide due to Pathani interest in Ulhasnagar?, the statement given by the victim woman | उल्हासनगरात पठाणी व्याजाला त्रस्त होऊन महिलेने संपवले जीवन?; पीडितेने दिले होते निवेदन

उल्हासनगरात पठाणी व्याजाला त्रस्त होऊन महिलेने संपवले जीवन?; पीडितेने दिले होते निवेदन

googlenewsNext

सदानंद नाईक

उल्हासनगर : कॅम्प नं-२, परिसरात राहणाऱ्या रविना गायी या महिलेने पठाणी व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून गुरवारी सायंकाळी आंबिवली स्टेशन परिसरात लोकल ट्रेन खाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. १२ सप्टेंबर रोजी ।महिलेने याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्यात अर्ज दिले असल्याचे उघड झाले. पोलिसांनी वेळीच दखल घेतली असतेतर महिलेचा जीव वाचला असता, असे बोलले जात आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-२ येथील बरखा इमारती मध्ये राहणाऱ्या रविना गायी यांचा मृतदेह कल्याण ते आंबिवली स्टेशन दरम्यान गुरवारी सायंकाळी मिळाला. रविना हिने पठाणी व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जाते. आत्महत्या करण्यापूर्वी १२ सप्टेंबर रोजी एक निवेदन उल्हासनगर पोलीस ठाण्यात दिले होते. पोलिसांनी वेळीच निवेदनाची दखल घेतली नसल्याने, अनर्थ झाल्याची टिका होत आहे. 

उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी मृत झालेल्या रविना गायी यांनी पोलीस ठाण्याला निवेदन दिले. मात्र महिलेने प्रत्यक्ष भेट घेतली नाही. अशी माहिती दिली. आत्महत्या केलेल्या रविना गायी यांची ६ महिन्यांपूर्वी संगीता गोविंद जोकांनी या पठाणी व्याजखोर महिले सोबत झाली. जोकांनी ही महिला व्याजाने पैसे देते, असे समजल्यावर रविना हिनेही व्याजाने पैसे घेऊन मुदत व व्याजासह परत केले. दरम्यान जोकांनी यांनी ग्राहक आणून दिल्यास, त्यांनाही व्याजाने पैसे देतो. अशी म्हणाली. त्या दरम्यान श्वेता लोईया, प्रगती सपकाळे, मनोज पंजवानी व गणेश माखिजा यांची ओळख संगीता जोकांनी यांच्या सोबत करून दिली. जोकांनी यांनी या चौघांना प्रत्येकी १ लाख रुपये व्याजाने दिले. मात्र हे चौघे व्याजाचे व मुदलचे पैसे देत नसल्याने, जोकांनी यांनी ओळख करून देणाऱ्या रविना गायी याना जबाबदार धरून, पैसे देण्याचा तगादा लावला. तू मेली तरी तुझ्या पती व मुलांकडून वसूल करेल, अशी धमकी दिली.

गायी यांचा मुलगा डिप्रेशन मध्ये असून पती आजारी आहेत. तर सासरे नायर मुंबई येथे उपचार घेत आहेत. असे उल्हासनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले. त्यावर त्वरित कारवाई न झाल्याने, रविना हिला जीव गमवावा लागला असल्याचे बोलले जात आहे. सहायक पोलिस आयुक्त अजय कोळी यांनी अशी घटना घडल्याची माहिती दिली आहे.

Web Title: Woman's suicide due to Pathani interest in Ulhasnagar?, the statement given by the victim woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.