कोरोना लसीच्या बहाण्याने ४ जणांना विष पाजलं; अनैतिक संबंधातून कुटुंबाला संपवण्याचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 08:39 AM2020-05-20T08:39:44+5:302020-05-20T08:41:46+5:30

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने विष देणाऱ्या दोन आरोपी महिलांना समयपूर येथून अटक केली आहे.

Women Act As Health Worker Gave Poison To Four Relatives In Name Of Corona Vaccine For Revenge pnm | कोरोना लसीच्या बहाण्याने ४ जणांना विष पाजलं; अनैतिक संबंधातून कुटुंबाला संपवण्याचा डाव

कोरोना लसीच्या बहाण्याने ४ जणांना विष पाजलं; अनैतिक संबंधातून कुटुंबाला संपवण्याचा डाव

Next
ठळक मुद्देपोलिसांनी केलं २ महिला आरोपींना अटक आरोग्य कर्मचारी बनून कोरोना लसीच्या बहाण्याने विष पाजलं. पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीचा प्रियकराच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न

नवी दिल्लीदिल्लीच्या उत्तरेकडील अलीपूर भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी आरोग्य कर्मचारी बनून आलेल्या महिलांनी ४ जणांना विष दिल्याची माहिती आहे. यात होमगार्ड विक्रम, त्याची आई, काका आणि अन्य एक नातेवाईक यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. विष दिल्यानंतर महिलांनी तिथून पळ काढला. शेजारील कुटुंबांने या चौघांना जमिनीवर पडल्याचं पाहून तातडीने राजा हरिशचंद्र रुग्णालयात दाखल केले. सध्या यांची परिस्थिती गंभीर आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने विष देणाऱ्या दोन आरोपी महिलांना समयपूर येथून अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी सांगितले की, विक्रमच्या प्रेयसीचा नवरा त्याच्या सांगण्यावरुन कोरोना लसीच्या बहाण्याने चार जणांना विष पाजलं. रविवारी या महिला दुपारी विक्रम यांच्या घरी पोहचल्या. तेव्हा आम्ही आरोग्य विभागाकडून आलो आहोत अशी बतावणी त्यांनी केली.

कोरोनापासून वाचण्यासाठी दिल्लीच्या प्रत्येक घरात औषध पाजलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर या महिलांनी विक्रम, त्याची आई, काका आणि एक नातेवाईक यांना विष पाजलं. त्यानंतर दोन्ही आरोपी महिला तिथून फरार झाल्या. अटक केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत त्यांनी सांगितलं की, रमजानपूरमध्ये राहणाऱ्या प्रदीप यांच्या सांगण्यावरुन विक्रमच्या संपूर्ण कुटुंबाला विष पाजलं गेल्याचं उघड झालं.

पोलिसांनी प्रदीपला अटक केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. यामध्ये आरोपीने सांगितले की, विक्रम आणि माझी पत्नी दोघांचे अनैतिक संबंध होते. दोघांना अनेकदा समजवण्यात आलं तरीही त्यांनी ऐकलं नाही.यावरुन विक्रमसोबत माझं भांडणही झालं. त्यानंतर एका माहितीच्या आधारे आरोपी प्रदीपने अन्य आरोपी महिलांशी संपर्क साधला. दोघांना मोठ्या प्रमाणात पैसे देऊन विक्रमच्या कुटुंबाला विष देऊन मारण्यास तयार केले असा गुन्हा आरोपी प्रदीपने पोलिसांसमोर कबुल केला.

Web Title: Women Act As Health Worker Gave Poison To Four Relatives In Name Of Corona Vaccine For Revenge pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.