गडगडाटाच्या आवाजाच्या धक्क्याने एका महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 09:50 PM2019-10-16T21:50:21+5:302019-10-16T21:51:27+5:30

हॉस्पिसियो रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

women died due to thundersound stroke at goa | गडगडाटाच्या आवाजाच्या धक्क्याने एका महिलेचा मृत्यू

गडगडाटाच्या आवाजाच्या धक्क्याने एका महिलेचा मृत्यू

Next
ठळक मुद्देकानढळया बसविणाऱ्या या आवाजाने पुष्पा हिला धक्का बसला.  सुरुवातीला पुष्पा हिच्यावर वीज कोसळल्याने तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरले होते.

मडगाव - गडगडाटाच्या आवाजाच्या हादऱ्याने गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील बाश्रे - पिसोणा येथे एका चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आज दुपारी ही घटना घडली. पुष्पा तोळू वेळीप असे मयताचे नाव असून, ती बागायतात मिरचीची रोपणी करत असताना ही दुदैवी घटना घडली. काल दुपारी साडेतीनच्या दरम्यान ढगाचा गडगडाट व वीजेच्या लखलखाटासह मूसळधार पाउस कोसळला. कानढळया बसविणाऱ्या या आवाजाने पुष्पा हिला धक्का बसला.  ती शेतातच कोसळली. मागाहून तिला मडगावच्या हॉस्पिसियो रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सुरुवातीला पुष्पा हिच्यावर वीज कोसळल्याने तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरले होते. मात्र, नंतर तिचे गडगडाटाच्या आवाजाने धक्का बसून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शवचिकित्सेंनतर मृत्यूचे नेमके निदान स्पष्ट होईल अशी माहिती कुंकळळी पोलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक टेरेन्स डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक हळर्णकर पुढील तपास करीत आहेत. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.पुढील तपास चालू आहे.

Web Title: women died due to thundersound stroke at goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.