लग्नानंतरही प्रेयसीला फोन करत होता प्रियकर, तिच्या पतीला समजलं आणि मग..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 10:54 AM2022-08-08T10:54:35+5:302022-08-08T10:54:48+5:30
Crime News : एसएचओ नरेश पोषवाल यांनी सांगितलं की, 26 वर्षीय जैनेंद्र उर्फ जैन आणि त्याची पत्नीला शिव कुमार नावाच्या तरूणाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Crime News : राजस्थानच्या (Rajasthan) धौलपूर(Dhaulpur) जिल्हाच्या कॅलारी भागात एका तरूणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनुसार, मृत तरूणाचं एका तरूणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. तरूणीचं लग्न झाल्यानंतरही तरूण तिला फोन करत होता. हे जेव्हा तिच्या पतीला समजलं तेव्हा त्याने पत्नीच्या माध्यमातून तिच्या प्रियकराला अज्ञात स्थळी बोलवलं आणि लोखंडी सळीने वार करत त्याची हत्या (Boyfriend Murder) केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह झुडपात फेकला.
एसएचओ नरेश पोषवाल यांनी सांगितलं की, 26 वर्षीय जैनेंद्र उर्फ जैन आणि त्याची पत्नीला शिव कुमार नावाच्या तरूणाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शिवकुमारचं जैनेंद्रच्या पत्नीसोबत लग्नाआधीपासून प्रेम प्रकरण सुरू होतं.
तरूणीचं दोन महिन्यांआधीच लग्न झालं होतं. लग्नानंतर तिच्या अफेअरबाबत तिच्या पतीला समजलं. त्यानंतर जैनेंद्रने पत्नीच्या प्रियकराच्या हत्येचा प्लान केला. पत्नीला त्याने शिवकुमारला फोन करण्यास सांगितलं आणि त्याला एका अज्ञात स्थळी बोलवलं. यानंतर दोघांनी लोखंडी सळ्यांनी हल्ला करत त्याची हत्या केली.
मृतक शिवकुमार प्रायव्हेट क्लीनिकमध्ये नोकरी करत होता. शेतात जात असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा मृतदेह झुडपांमध्ये पडलेले दिसला. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. सूचना मिळाल्यावर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यानंतर प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला अटक केली. पुढील कारवाई सुरू आहे.