महिलेने मुलीच्या मदतीने केली पतीची हत्या, अनैतिक संबंधाला करत होता विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 09:44 AM2022-10-17T09:44:24+5:302022-10-17T09:45:23+5:30

Crime News : तूतिकोरिनमध्ये पोलिसांना जंगलात जळालेला मृतदेह सापडला. चौकशीतून समजलं की, मृतदेह गगनशेखर नावाच्या व्यक्तीचा आहे. तो मासे विकत होता.

Women killed husband with help of daughter and burnt him Tuticorin Tamilnadu | महिलेने मुलीच्या मदतीने केली पतीची हत्या, अनैतिक संबंधाला करत होता विरोध

महिलेने मुलीच्या मदतीने केली पतीची हत्या, अनैतिक संबंधाला करत होता विरोध

Next

Crime News : एका महिलेने मुलीसोबत मिळून अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पतीची हत्या केली. इतकंच नाही तर महिलेने मुलीच्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लान केला. तिघेही मृतदेह जंगलात घेऊन गेले आणि तिथे मृतदेहाला पेटवलं. ही घटना तामिळनाडूच्या (Tamil Nadu) तूतिकोरिन जिल्ह्यातील आहे. जंगलात जळालेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.

तूतिकोरिनमध्ये पोलिसांना जंगलात जळालेला मृतदेह सापडला. चौकशीतून समजलं की, मृतदेह गगनशेखर नावाच्या व्यक्तीचा आहे. तो मासे विकत होता. पोललिसांनी चौकशी दरम्यान समजलं की, हत्या अनैतिक संबंधातून झाली आहे. पोलिसांनी जेव्हा शेजाऱ्यांना विचारपूस केली तर सांगण्यात आलं की, महिला आणि तिच्या पतीचं घटनेच्या दिवशी खूप भांडण झालं होतं.

पीटीआयनुसार, यानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या मुलीची चौकशी केला. तेव्हा त्याने वेगवेगळे जबाब दिले. यानंतर पोलिसांनी मृतकाची पत्नी आणि मुलीवर संशय आला. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवला तेव्हा दोघींनीही त्यांचा गुन्हा कबूल केला.

पोलिसांनुसार, पतीला संशय होता की, त्याच्या पत्नीचं कुणासोबत तरी अफेअर सुरू आहे. इतकंच नाही तर त्याला हेही समजलं होतं की, त्याच्या मुलीचंही एका तरूणासोबत अफेअर सुरू आहे. यावरून तिघांमध्ये भांडण होत होतं. भांडण इतकं वाढलं की, महिलेने मुलीसोबत मिळून पतीची हत्या केली. यात त्यांनी तरूणाच्या प्रियकराची मदत घेतली.

ते मृतदेह जंगलात घेऊन गेले आणि तिथे त्याला आग लावली. मृतदेहाचे काही अवशेष शिल्लक राहिले. त्यामुळे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: Women killed husband with help of daughter and burnt him Tuticorin Tamilnadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.