मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलेल्या महिलेचा सुरीने वार करून खून; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 08:55 PM2020-05-28T20:55:15+5:302020-05-28T21:01:43+5:30
ही महिला होती दीर्घकाळापासून आजारी होती.
पुणे : दीर्घ आजाराला कंटाळून घरातून बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यावर सुरीने वार करून तिचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वानवडीपोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.ज्योती दीपक कांबळे (वय ३५, रा. मंजुळाबाई चाळ, भवानी पेठ) असे यामहिलेचे नाव आहे. ही घटना २६ मे रोजी कमांड हॉस्पिटलच्या मागील बाजूला २६मे रोजी सकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली.याप्रकरणी दीपक कांबळे यांनी वानवडीपोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती कांबळे या दीर्घकाळापासून आजारी होत्या. त्यांना दोन महिन्यांपासून खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते.त्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. २६ मे रोजी सकाळी साडेआठ वाजता त्या फिरायला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडल्या. त्या परत आल्या नाही. त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. परंतु, त्या मिळूनआल्या नाहीत. कमांड हॉस्पिटलच्या मागील बाजूला एका रखवालदाराने महिला पडली असल्याचे पाहिले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. दीपक कांबळे यांनी तो मृतदेह ज्योती यांचाच असल्याचे ओळखले. त्यांच्या गळ्यावर एक सुरीने वार केल्याची खूण होती. याबाबत पोलिसांनी शवविच्छेदनात हा वार स्वत: करून घेतला की दुसऱ्यांनी केला असल्याची शक्यता आहे, याविषयी डॉक्टरांचे मत मागितले होते. डॉक्टरांच्या मतानुसार पोलिसांनी अज्ञात गुन्हेगाराविरोधात
खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील अधिक तपास करीत आहे.