पोलीस ठाण्यात महिला पोलिसाने शूट केला टिक - टॉक व्हिडीओ अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 05:55 PM2019-07-25T17:55:36+5:302019-07-25T17:57:56+5:30
तिला निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.
गुजरात - पोलीस ठाण्यात टिक - टॉक व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर करणं गुजरातमधील महिला पोलिसाला महागात पडलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.
मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज पोलीस ठाण्यात कार्यरत असणारी महिला पोलीस अर्पिता चौधरी हिनं कामावर असताना टिक - टॉक व्हिडीओ शूट केला. पोलीस ठाण्यात असलेल्या तुरुंगाच्या समोरच ती बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडीओ २० जुलै रोजी पोलीस ठाण्यात सिव्हिल ड्रेसमध्ये शूट करण्यात आला होता. त्यानंतर व्हॉट्सअॅपसह अन्य सोशल मीडिया साईटवर तो व्हायरल झाला.
Gujarat: Lady cop on duty made TikTok video where she can be seen dancing next to lockup in Langhanaj police station, Mehsana. Video of incident has gone viral. She was dressed in civilian clothes. Police says,"concerned cop, Arpita Chaudhary has been suspended from duty." (24/7) pic.twitter.com/r9jb2cCwBa
— ANI (@ANI) July 24, 2019
Lady police constable in Mahesana district of North Gujarat faces disciplinary action after her TikTok video shot in police station goes viral pic.twitter.com/7NWXpXCh8r
— DeshGujarat (@DeshGujarat) July 24, 2019