अपत्यप्राप्तीच्या नावावर भोंदू बाबा महिलेवर होता रेप, पतीने रात्री खिडकीतून पाहिलं अन् झाला भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 04:44 PM2022-05-06T16:44:27+5:302022-05-06T16:57:13+5:30
fraud Baba raped women in Bihar : भागीपुर गावातील ही घटना आहे. चिल्का बाबाचे शिकार झालेल्या दाम्पत्याने आलमनगर पोलीस स्टेशनमध्ये बाब विरोधात तक्रार दाखल केली आहे.
बिहारच्या (Bihar) मधेपुरा जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे अपत्यप्राप्तीची गॅरंटी देणाऱ्या एका भोंदू बाबाने महिलेसोबत रेप (fraud Baba raped women) केला. बाबा अशा महिलांचा शोध घेत होता, ज्यांना मुल-बाळ होत नव्हती. अशा महिलांना तंत्र-मंत्राच्या नावावर तो बंद खोलीत नेत होता आणि त्यांच्यासोबत रेप करत होता. जर एखादी महिला तिच्या पतीसोबत आली तर त्याची झोपण्याची व्यवस्था बाहेर करत होता. अशाच एका पतीला त्याच्या पत्नीसोबत होत असलेला प्रकार दिसला आणि हे प्रकरण समोर आलं.
भागीपुर गावातील ही घटना आहे. चिल्का बाबाचे शिकार झालेल्या दाम्पत्याने आलमनगर पोलीस स्टेशनमध्ये बाब विरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित दाम्पत्याने सांगितलं की, लग्नाला बरीच वर्ष होऊनही त्यांना मुल झालं नव्हतं. यादरम्यान गावातील एका महिलेने त्यांना चिल्का बाब उर्फ कैलाश पासवानबाबत सांगितलं. महिलेने दाम्पत्याला सांगितलं की, बाबाच्या तंत्रा-मंत्राने तिला दोन मुली झाल्या. दोघांनीही महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ते सतत बाबाके भागीपूरला जाऊ लागले.
पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, रात्री तंत्रमंत्राच्या नावावर चिल्का बाबा तिच्या पतीला घराबाहेर झोपण्यास सांगत होता आणि महिलेला रूममध्ये घेऊन जात होता. यानंतर बाबा प्रसादाच्या नावावर नशेचा पदार्थ खाऊ घालत होता आणि बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर अत्याचार करत होता. नशेत असल्याने महिला आणि तिच्या पतीला काही समजत नव्हतं. अनेक महिने तंत्रमंत्राच्या नावावर बाबा दाम्पत्याला शिकार बनवत राहिला.
बुधवारी रात्रीही बाबाने महिलेला फोन करून बोलवलं होतं. इतर रात्रींप्रमाणे त्या रात्रीही तसंच केलं. पण महिलेच्या पतीची अचानक झोप उघडली. त्याला दिसलं की, त्याचे हातपाय बांधले आहेत. त्याने कसेतरी हातपाय सोडवले आणि बाबाच्या रूममध्ये डोकावून पाहिलं तर बाबा त्याच्या पत्नीसोबत दुष्कर्म करत होता. हे बघून त्याला धक्का बसला. तो लगेच आत गेला आणि पत्नीला वाचवलं.
यानंतर तिथे पतीने वाद सुरू केला. दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी देत चिल्का बाबा तेथून फरार झाला. असं सांगितलं जात आहे की, चिल्का बाबाने पंजाबच्या महिलांसोबतही असंच कृत्य केलं. ज्यामुळे वाद झाला होता. पण कोणतीही कारवाई झाली नाही.
याप्रकरणी एसपी राजेश कुमार यांनी सांगितलं की, पीडित दाम्पत्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेची चौकशी करत आहेत. लवकरच भोंदू बाबाला अटक केली जाईल. असंही सांगितलं जात आहे की, हा भोंदू बाबा आधीही तुरूंगात गेला होता.