नोकरीच्या बहाण्याने महिलाच ४० हजारांत करत होती मुलींचा सौदा 

By पूनम अपराज | Published: January 31, 2021 02:54 PM2021-01-31T14:54:03+5:302021-01-31T14:55:12+5:30

Human trafficking : पूनमला शुक्रवारी रांची विमानतळावर  मानवी तस्करीच्या आरोपामध्ये रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

Women were selling girls for Rs 40,000 under the pretext of job | नोकरीच्या बहाण्याने महिलाच ४० हजारांत करत होती मुलींचा सौदा 

नोकरीच्या बहाण्याने महिलाच ४० हजारांत करत होती मुलींचा सौदा 

Next
ठळक मुद्देपूनम मागच्या आठ वर्षांपासून या व्यवहारात आहे. दिल्लीमध्ये तिचे एक ऑफिस देखील आहे. प्रत्येक मुलीमागे ४० हजार रुपये कमिशन मिळत होतं.

झारखंडमधील मानवी तस्करी प्रकरणात अटक झालेल्या पूनम  बारलाला  तुरुंगात पाठविण्यात आले. पोलिसांनी दावा केला आहे की, पूनम प्लेसमेंट एजन्सी चालवून अत्यंत लबाडीने मुलींची तस्करी करीत होती. पूनमला शुक्रवारी रांची एअरपोर्ट येथून मानवी तस्करीच्या आरोपाखाली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिस चौकशीत मानवी तस्करीच्या आरोपीने पोलिसांसमोर अनेक गुपित उघडले आणि सांगितले की, एका मुलीला दिल्लीला पाठवल्याच्या बदल्यात तिला ४० हजार रुपये कमिशन मिळत असे.

पूनमला शुक्रवारी रांची विमानतळावर  मानवी तस्करीच्या आरोपामध्ये रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये पुनमने या गोरखधंद्यातील अनेक रहस्य उघड केली आहेत. झारखंड पोलिसांनी पूनमसह सात मुलींना रांची विमानतळावर ताब्यात घेतलं. या सर्व मुली खूंटी जिल्ह्यातल्या आहेत. त्यांना नोकरी देण्याच्या नावाखाली विमानानं दिल्लीला नेलं जात होतं. पूनम मागच्या आठ वर्षांपासून या व्यवहारात आहे. दिल्लीमध्ये तिचे एक ऑफिस देखील आहे. प्रत्येक मुलीमागे ४० हजार रुपये कमिशन मिळत होतं. आजवर ५०० पेक्षा जास्त मुलींची तस्करी केली आहे, अशी कबुली पूनमने दिली आहे.

वडील ओरडल्यानंतर दहावीत शिकणाऱ्या एकुलत्या एक मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

Web Title: Women were selling girls for Rs 40,000 under the pretext of job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.