ठाण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 09:49 PM2018-12-28T21:49:24+5:302018-12-28T21:49:52+5:30
ठाणे - 4 ऑगस्ट 2018 भररस्त्यात कॉलेज तरुणी प्राची धाडे हिच्यावर एकतर्फी चाकू हल्ला झाला आणि यात तिचा जीव गेला. या घटनेने ...
ठाणे - 4 ऑगस्ट 2018 भररस्त्यात कॉलेज तरुणी प्राची धाडे हिच्यावर एकतर्फी चाकू हल्ला झाला आणि यात तिचा जीव गेला. या घटनेने ठाण्यात खळबळ माजली होती. 17 सप्टेंबरला मुंब्य्रात तरुणीवर एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला झाला. त्यानंतर अवघ्या 20 दिवसांनंतर 11 नोव्हेंबरला पुन्हा पालिकेच्या परिचारिका प्रशिक्षण केंद्रात याच कारणाने बबिता दुबे नावाच्या महिलेवर चाकूने वार झाले. एकतर्फी प्रेमातून एकामागून एक घटना घडत असताना शहरात रोज कुठे ना कुठे तरुणी, महिलाबलात्कार, विनयभंग, छेडछाडीला सामोऱ्या जात होत्या. ठाणे पालीस आयुक्तालय क्षेत्रातील पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या 11 महिन्यांत दाखल झालेल्या रेकॉर्डनुसार दिवसाला सरासरी 4 बलात्कार, 8 विनयभंग तर दर दोन दिवसांतून एक छेडछाडीचे गुन्हे ठाण्यात घडत आहेत. त्यामुळे ठाणे खरोखरच महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयात दाखल गुह्यांनुसार ठाणे, वागळे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवलीत 334 दिवसांत 1 हजार 136 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. तर 2 हजार 739 गुन्हे विनयभंगाचे दाखल झाले असून रोडरोमिओंच्या छेडछाडीला 180 जणींना सामोरे जावे लागले आहे. या गुह्यांची सरासरी काढली तर दिवसाला 4 बलात्कार, 8 विनयभंग तर दर दोन दिवसांतून एक छेडछाडीचे गुन्हे ठाण्यात घडत आहेत.