मपोसे अधिकाऱ्यांचे कार्यमुल्यांकन आठवड्याभरात करा; महासंचालकांची घटकप्रमुखांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 08:20 PM2019-04-08T20:20:13+5:302019-04-08T21:05:03+5:30

आॅनलाईन माहिती द्यावी लागणार

Work schedule of Mopsese officers in a week; Instructions to the Director General | मपोसे अधिकाऱ्यांचे कार्यमुल्यांकन आठवड्याभरात करा; महासंचालकांची घटकप्रमुखांना सूचना

मपोसे अधिकाऱ्यांचे कार्यमुल्यांकन आठवड्याभरात करा; महासंचालकांची घटकप्रमुखांना सूचना

Next
ठळक मुद्देया अधिकाऱ्यांच्या गत आर्थिक वर्षाच्या कामाचा आढावा त्यांनी १५ एप्रिलपर्यंत आॅनलाईन पद्धतीने लिहावयाचे आहेत.‘मपोसे’असलेल्या उपायुक्त/ अप्पर अधीक्षक/ सहाय्यक आयुक्त/ उपअधीक्षक यांच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षातील कामाचे मुल्यांकन अद्याप घटकप्रमुखांकडून करण्यात आलेले नाही.

मुंबई - पोलीस घटक प्रमुख व प्रभारी अधिकारी आणि अंमलदार यांच्यातील समन्वयक म्हणून भूमिका बजावित असलेल्या राज्य पोलीस सेवेतील (मपोसे) उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व उपअधीक्षक यांच्या वार्षिक कार्याचे मुल्यांकन करण्यासाठी राज्यातील सर्व घटक प्रमुखांना आठवड्याभराची मुदत देण्यात आलेली आहे. या अधिकाऱ्यांच्या गत आर्थिक वर्षाच्या कामाचा आढावा त्यांनी १५ एप्रिलपर्यंत आॅनलाईन पद्धतीने लिहावयाचे आहेत.
पोलिसांना कौशल्यपूर्ण व साहसी कर्तृत्वपूर्ण कामगिरीबद्दल सरकारकडून देण्यात येणाऱ्या शौर्यपदक, सन्मानचिन्ह दिली जातात. त्यासाठी त्यांचे वार्षिक गोपनिय अहवाल (एसीआर) व बक्षीसे महत्वाची असतात. त्यामुळे बढती, बदलीबरोबरच या पुरस्कारासाठी त्यांचा ‘एसीआर’ अत्यंत महत्वाचा असतो. राज्य सरकारने अधिकाऱ्यापासून कारकूनापर्यंत सर्वांचे गोपनीय अहवाल आॅनलाईन पद्धतीने लिहिण्याचा नियम गेल्या वर्षापासून लागू केला आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपल्या अधिपत्याखालील अधिकारी, अंमलदारांची कामाच्या अहवालाची पूर्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधितांची वार्षिक वेतनवाढ न देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
‘मपोसे’असलेल्या उपायुक्त/ अप्पर अधीक्षक/ सहाय्यक आयुक्त/ उपअधीक्षक यांच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षातील कामाचे मुल्यांकन अद्याप घटकप्रमुखांकडून करण्यात आलेले नाही. त्यासाठी पोलीस महासंचालकांनी सर्व घटकप्रमुखांना १५ एप्रिलपर्यत मुदत दिली आहे. या कालावधीत विहित नमून्यात त्याची पूर्तता करावयाची आहे. त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी सदर नमून्यातील माहिती अचूकपणे भरल्याची खातरजमा करुन मुख्यालयाचे उपायुक्त/ अधीक्षकांकडून प्रमाणित करुन घेवून मुख्यालयात पाठवावयाची आहे. मात्र जे अधिकारी ३० जूनपर्यंत सेवानिवृत्त होणार असतील त्यांची माहिती आॅनलाईन प्रक्रियेतून वगळावयाची आहे. त्यासंबंधी मुख्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्क साधावयाचा आहे.

 

 

 

 

Web Title: Work schedule of Mopsese officers in a week; Instructions to the Director General

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.