कांबा येथे बाचाबाचीतून एका कामगाराची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 09:44 PM2019-09-03T21:44:43+5:302019-09-03T21:53:03+5:30

यातूनच एका कामगाराची हत्या झाल्याची घटना  टिटवाळा पोलिसांनी उघडकीस आणली आहे.                                        

A worker has murdered in Kamba | कांबा येथे बाचाबाचीतून एका कामगाराची हत्या

कांबा येथे बाचाबाचीतून एका कामगाराची हत्या

Next
ठळक मुद्देरविवारी सुट्टी असल्याने सकाळी दोघांनी मासे पकडण्याचा बेत आखला असता गुटखा पुड्डीवरून दोघामध्ये बाचाबाची झाली.टिटवाळा पोलीस स्टेशनचे व.पो.नि बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. पी. आय. बजरंग रजपूत अधिक तपास करीत आहेत.

टिटवाळा - कांबा परिसरातील खदानीमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांमध्ये बाचाबाची झाली होती. यातूनच एका कामगाराची हत्या झाल्याची घटना  टिटवाळा पोलिसांनी उघडकीस आणली आहे.                                        

कांबा परिसरातील खदाणीमध्ये काम करणारे कामगार श्रीराम मारूती गिरशेट्टी वय (३२) वर्षे तसेच प्रल्हाद शेळके हे दोघे कांबा गाव परिसरात राहत होते. रविवारी सुट्टी असल्याने सकाळी दोघांनी मासे पकडण्याचा बेत आखला असता गुटखा पुडीवरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. रविवारी संध्याकाळी श्रीराम बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांनी नोंद केली. त्या अनुषंगाने पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेतला. अखेर मंगळवारी जंगल भागाच्या आहोळा जवळ श्रीराम यांंचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपास केला असता श्रीराम व प्रल्हाद यामधील झालेल्या बाचाबाचीतील वादाचा राग धरुन प्रल्हाद शेळके यांचा मुलगा भोला आणि जावई रणजित यांनी मयत श्रीराम याला गोड बोलुन रविवारी दुपारी आहोळाच्या ठिकाणी नेऊन गळा आवळून हत्या केली, असावी असा प्राथमिक अंदाज असून याप्रकरणी पोलिसांनी  ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपी भोला शेळके, रणजित या फरारी आरोपी च्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली असून श्रीराम यांचा मुत्युदेह पोस्टमार्टेमसाठी जे. जे. रूग्णालयात पाठविला असून  संदर्भात गुन्ह्याचा  टिटवाळा पोलीस स्टेशनचे व. पो. नि बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. पी. आय. बजरंग रजपूत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A worker has murdered in Kamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.