लोको ट्रेनच्या धडकेत कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:46 PM2020-12-23T16:46:09+5:302020-12-23T16:46:21+5:30
सॅनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत मालवाहतूक करणाऱ्या लोको ट्रेनच्या धडकेने कामगाराचा मृत्यू झाला.
वरठी(भंडारा) : सॅनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत मालवाहतूक करणाऱ्या लोको ट्रेनच्या धडकेने कामगाराचा मृत्यू झाला. सदर घटना काल रात्री १०.३५ च्या सुमारास घडली. यात विकास गणवीर (५३)च्या सुमारास कंपनीत घडली. मृतकाचे नाव विकास गणवीर(५३) रा शास्त्री वार्ड वरठी असे आहे.
मृतक विकास गणवीर हे सॅनफ्लॅग कंपनीत अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून कामावर होते. घटनेच्या दिवशी रात्रपळीवर कार्यरत होते. लोकोपायलट ट्रेन द्वारा होणारी मालवाहतूक डब्यातून येणाऱ्या मालाला वॅगन ट्रीपलर च्या साहायाने खाली करण्याचे काम सुरू होते. दरम्यान मालवाहतूक करणाऱ्या गाडीला इतर डब्यापासून जोडण्याचे काम सुरू असताना लोकोपायलट च्या चुकीने मृतक विकास दोन्ही डब्यांच्या मधात अडकला व त्याला जोरदार धडक बसली. यात त्याचा घटनास्थळावर मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. मुलगी अभियांत्रिकीला शिकत आहे. दोन्ही मुले लहान असून कुटुंबाचा आधार हारावल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यांच्या कुटुंबियांना नियमानुसार आवश्यक असलेली मदत व एकाला स्थायी नोकरी देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
हा कंपनीचा अमानुष व्यवहार
विकास हा अपघात रात्री १०.३५ च्या सुमारास झाले. तो वरठी येथे राहत असून त्याचे निवासस्थान कंपणीपासून जवळच आहे. पण अपघात झाल्याची माहिती कुटुंबियांना देण्यात हयगय करण्यात आल्याचा आरोप बहीण सुरेखा हुमने यांनी केला आहे. अपघाताची माहिती न देता परस्पर मृतदेह भंडारा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात होण्यास कंपनी व्यवस्थापन कारणीभूत असून अपघाताचे मूळ कारण दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत व स्थायी नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सध्या आंदोलन सुरु आहे.