अलगीकरण कक्षातील कामगार निघाला चरस तस्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:34 AM2020-09-20T01:34:23+5:302020-09-20T01:34:39+5:30
मीरा-भार्इंदर महापालिका । जूनपासून होता कामाला
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अलगीकरण कक्षात सुरक्षारक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडलेली असतानाच आता मुंबई पोलिसांनी पकडलेला अमली पदार्थ विक्रेता हा पालिकेच्या याच अलगीकरण कक्षात सफाई कामगार म्हणून कामाला होता, असे उघड झाले आहे.
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने १५ सप्टेंबर रोजी भार्इंदर पूर्वेला गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलाजवळ पालिकेच्या अलगीकरण कक्षाबाहेर सापळा रचून अविनाश सिंह (२४) व श्रवण गुप्ता (३८) या दोघांना २ किलो चरससह अटक केली. हे दोघेही आरोपी नालासोपाराचे राहणारे आहेत. या आरोपींनी भार्इंदरच्या बलराम उर्फ बल्ली यादव (३३) याच्याकडून चरस घेतल्याचे पोलिसांना सांगितले होते. यादव हा नेपाळहून उत्तर प्रदेश, बिहारमार्गे चरस आणत असे. नवघर पोलिसांनी यादवची चौकशी केली असता अविनाश हा अलगीकरण कक्षात सफाई कामगार म्हणून काम करत होता. १२ सप्टेंबर रोजीच त्याला चरसचा पुरवठा केला होता, असे चौकशीत उघड झाले. दरम्यान, अविनाश हा सिटीझन अलाइट या ठेकेदाराकडे कर्मचारी असल्याचे उघड झाले. तो जूनपासून पालिकेच्या अलगीकरण कक्षात सफाई कामगार म्हणून काम करीत होता. मुंबई पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी त्याला पकडले त्या वेळी तो कामावर हजर होता. त्यानंतर मात्र तो कामावर आलेला नाही, असे अलगीकरण कक्षातून सूत्रांनी सांगितले. बल्लीने चरसचा साठा दिला तो अविनाश याने अलगीकरण कक्षातच ठेवला होता, असा संशय आहे. शिवाय याआधी त्याने चरसची तस्करी व विक्री केल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
पालिकेच्या या अलगीकरण कक्षात सैनिक सिक्युरिटी या ठेकेदाराच्या सुरक्षारक्षकाने अलगीकरण कक्षात ठेवलेल्या २० वर्षीय नवविवाहितेवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर विक्रम शेरे याला अटक करण्यात आली.
एमडी ड्रग्स बाळगणारे
दोघे जण गजाआड
1ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमीरा युनिटने एमडी या अमली पदार्थांसह दोघांना मीरा रोडच्या नयानगर भागातून अटक केली आहे. पथक नयानगर परिसरात गस्त घालत असताना संशयावरून त्यांनी दोन
तरु णांना ताब्यात घेतले.
2त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे एमडी हे अमली पदार्थ आढळले. पोलिसांनी आसिफ अली अफजर शेख (२४) व तारीक सिद्दिकी (२२) या दोघांना अटक केली. आसिफकडे २५ ग्रॅम तर तारिककडे २० ग्रॅम एमडी ड्रग्स सापडले. आरोपींना ठाणे न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.