‘लालबागचा राजा’ मंडळातील कार्यकर्त्यांना पोलिसांशी हुज्जत घालणं पडणार महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 07:30 PM2018-09-21T19:30:53+5:302018-09-21T19:31:10+5:30

अनंत चतुर्दशीनंतर कारवाई करण्याचे मुंबई पोलिसांचे आदेश 

The workers of Lalbaugcha Raja Mandal will have to deal with the police | ‘लालबागचा राजा’ मंडळातील कार्यकर्त्यांना पोलिसांशी हुज्जत घालणं पडणार महागात

‘लालबागचा राजा’ मंडळातील कार्यकर्त्यांना पोलिसांशी हुज्जत घालणं पडणार महागात

Next

मुंबई - लालबागच्या राजाच्या दरबारातील मुजोर कार्यकर्त्यांभोवती आता पोलिसांनी फास आवळ्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी चौकशीचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाकाऱ्यांकडून माहिती मिळाली आहे. त्यासाठी मंगळवारी घडलेल्या प्रकारबाबतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मंडळाकडून ताब्यात घेतले असून पोलीस या फुटेजची पडताळणी करून योग्य ती कारवाई करणार आहेत. 

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपल्या ओळखीच्या व्यक्तीला विरूद्ध दिशेने आत आणण्याचा प्रयत्न मंगळवारी एका कार्यकर्त्यांने केला. राजाच्या मुख दर्शनाच्या रांगेतून त्यांना थेट नवसाच्या रांगेत घुसवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. तेव्हा पोलिस गर्दी पांगवत असताना नवसाच्या रांगेत घुसू पाहणाऱ्यांना पोलिस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी रोखलं. त्यावरून एका कार्यकर्त्याने त्यांना ओळखीच्या व्यक्तींना आत सोडण्याचा आग्रह केला. मात्र, भाविकांची गर्दी लक्षात घेत अभिलाश कुमार यांनी ते शक्य नसल्याचं सांगिल्याने कार्यकर्ते अभिलाश कुमार यांच्याशी वाद घालू लागले. हा वाद इतका चिघळला की कार्यकर्ते पोलिस उपायुक्त अभिनाश कुमार यांना थेट धक्काबुक्की करू लागले. त्यावेळी पोलिसांनी संबधित कार्यकर्त्याला पकडण्याचा प्रयत्नला असता इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

लालबाग राजाच्या दरबारात कार्यकर्त्यांच्या मुजोरीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अशाच काही कारणांवरून कार्यकर्ते आणि पोलिस एकमेकांना भिडले आहेत. याआधी देखील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत आणि भाविकांसोबत काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुकीचा प्रकार घडला होता. मंगळवारी कार्यकर्त्यांनी थेट पोलिस उपायुक्तांनाच धक्काबुक्की केल्याने हे प्रकरण प्रशासनाकडून गंभीरपणे घतले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असून या चौक‍शीच्या अहवालातून दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी, पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की 

Web Title: The workers of Lalbaugcha Raja Mandal will have to deal with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.