धक्कादायक! प्रायव्हेट पार्टची पूजा केली, नंतर पॉर्न व्हिडीओ, २०० मुलींसोबत लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:10 IST2025-04-03T17:06:50+5:302025-04-03T17:10:30+5:30
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. २०० मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

धक्कादायक! प्रायव्हेट पार्टची पूजा केली, नंतर पॉर्न व्हिडीओ, २०० मुलींसोबत लैंगिक अत्याचार
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभलमध्ये २०० मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका आंतरराज्य टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून मुलींचे अश्लील व्हिडीओ जप्त केले आहेत. ही टोळी पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली लोकांना फसवत होती . धनवर्षा टोळी गरीब मुलींच्या कुटुंबियांना फसवून तांत्रिक विधी करत असल्याचे सांगत होती. या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
मिळालेली माहिती अशी, मुलींच्यावर तंत्र विधी केली जात असायची. या तंत्र विधी दरम्यान, कुटुंबातील सदस्यांना बाहेर पाठवले जात होते आणि तंत्र विधी दरम्यान, मुलींच्या गुप्तांगांची आधी पूजा केली जायची आणि नंतर विधी केला जात होता. तांत्रिक विधीनंतर मुलींसोबत काय घडायचे याची माहिती मुलींनाही माहित नसायचे, यावेळी त्या मुलींचा व्हिडीओ बनवला जात होता. यानंतर हे व्हिडीओ पॉर्न साईट्सना विकल्याचाही संशय आहे.
धक्कादायक! प्राथमिक मराठी शाळेतील कर्मचाऱ्याकडून १० चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोन दिवसापूर्वी राजपाल नावाच्या एका तरुणाचे अपहरण करुन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मिळाली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर या टोळीचा पर्दाफाश झाला. ही टोळी लोकांना पैशांचा वर्षाव करण्याचे आश्वासन देऊन आमिष दाखवते. ते गरीब कुटुंबांना लक्ष्य करायचे. ते एखाद्या दुर्मिळ वस्तूवर म्हणजेच २० नखे असलेला कासव, दोन डोके असलेला साप, घुबड, विशेष क्रमांक असलेल्या चलनी नोटा या गोष्टींची वापर तांत्रिक विधीसाठी वापरत होते. मुलींना टीटी म्हटले जात असे आणि त्यांना तांत्रिक विधींसाठी तयार केले जायचे.
यो टोळीतील लोक गरीब कुटुंबियांना फसवत होते. त्या कुटुंबीयांना तुमच्या मुलीमध्ये विशेष गुण आहेत असं सांगून तांत्रिक विधी केला तर पैशांचा पाऊस पडेल असं आमिष दाखवत होते.
तंत्र-मंत्राच्या नावाखाली तस्करी
ही टोळी तांत्रिक विधींद्वारे संपत्तीचे आमिष दाखवून गरीब मुला-मुलींची तस्करी आणि लैंगिक शोषण करत असे आणि दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या बेकायदेशीर तस्करीमध्येही सहभागी होती. या टोळीचे जाळे दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये पसरले आहे. हे लोक तंत्रक्रियेच्या नावाखाली एखाद्या विशिष्ट वस्तूवर लोकांची फसवणूक करत होते. सध्या आग्र्यात टोळीचे नेटवर्क वेगाने वाढत आहे, आग्रा येथून या टोळीला पोलिसांनी अटक केली. या प्रखरणी पोलिसांनी आता अधिक तपास सुरू केला आहे या टोळीचे देशभर जाळ पसरल्याचा संशय पोलिसांना आहे.