व्वा सुनबाई! मुलासह सासूला फेकले चालत्या रिक्षेतून अन् चालक करू लागला छेडछाड
By पूनम अपराज | Published: October 29, 2020 10:18 PM2020-10-29T22:18:49+5:302020-10-29T22:19:22+5:30
Molestation : छेडछाड, प्राणघातक हल्ला आणि इतर कलमांसह या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर चालकास अटक करण्यात आली आहे.
आग्रा येथे बुधवारी चालकांनी रामबाग चौकापासून पॉवरहाऊसकडे जाणाऱ्या सासू आणि सुनेला ऑटोवाला नको त्या मार्गाने घेऊन जाऊ लागला. बसण्यास सुरुवात केली. सासूने ऑटो थांबवण्यास सांगितल्यानंतर तिला रिक्षेतून ढकलून दिले. यानंतरही सुनेला घेऊनपुढे घेऊन गेला. तिच्यावर विनयभंग केला. सूनने ऑटो ड्रायव्हरची कॉलरपकडून आरडाओरडा केला आणि ब्रेक दाबून ऑटो थांबवली. स्थानिकांनी घेराव घालून ऑटो थांबविली. छेडछाड, प्राणघातक हल्ला आणि इतर कलमांसह या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर चालकास अटक करण्यात आली आहे.
ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली. सदर येथील सोहल्ला येथील रहिवासी जलेसर येथून ३ वर्षाचा मुलगा आणि सासू यांना घेऊन सून परतत होती. रामबाग चौकात बसमधून खाली उतरल्यानंतर ती ऑटोमध्ये गेली. ऑटोमध्ये आधीपासूनच चार तरुण होते. महिलेने असा आरोप केला आहे की, ड्रायव्हर बराच काळ ओव्हरब्रिजभोवती ऑटो फिरवत राहिला. नंतर ते नुन्हाई रोडवर नेण्यात आले. त्याने चुकीच्या रस्त्यावर घेऊन गेला. त्यावेळी ड्रायव्हरने वाहन तपासणीचे कारण देऊन दुसर्या मार्गावरुन जात आहे असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. त्यांनतर ऑटो थांबवण्यासाठी सांगितले असता चालकाने वेग वाढविला. सासूने विरोध केला. त्यानंतर ड्रायव्हरने त्यांना नुनिहाई मार्गावर ऑटोमध्ये ढकलले.
महिला आणि तिचा नातू जखमी झाले
या महिलेच्या मांडीवर तीन वर्षाचा नातूही होता. दोघेही रस्त्यावर पडले आणि जखमी झाले. असे असूनही चालक थांबला नाही. ऑटोमध्ये सुनेचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. यावर सून मोठमोठ्याने ओरडू लागली. ड्रायव्हरने तिला मारहाण केली, तिच्यावर अत्याचार केले आणि तिची छेडछाड केली. सुनेने कशी तरी ड्रायव्हरची कॉलर पकडली. सुनेचा आवाज ऐकून लोकं जमले. त्यांनी घेराव घालून ऑटो थांबविली. यानंतर ड्रायव्हरला पकडण्यात आले. पोलिसांनी माहिती मिळताच त्याला ताब्यात घेतले.
पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक विनोद कुमार यांचे म्हणणे आहे की, विनयभंग, प्राणघातक हल्ला, शिवीगाळ आणि जीवघेणा हल्ला या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालक मनीष हा मालपुरा येथील रहिवासी आहे. मनीषने चौकशीत सांगितले की, तपासणी टाळण्यासाठी तो दुसर्या मार्गाने जात आहे. महिलांनी यावर निषेध करण्यास सुरूवात केली. एक स्त्री उतरली. तर दुसरी बसली होती.