कुस्तीपटू सुशील कुमारला अटकेनंतर भारतीय रेल्वेने केले निलंबित; आता नोकरीही गेली 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 03:58 PM2021-05-25T15:58:08+5:302021-05-25T15:59:43+5:30

Wrestler Sushil Kumar suspended by Railways : हत्येच्या आरोपावरून सुशील कुमारविरोधात चौकशी सुरू झाल्यानंतरच रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.

Wrestler Sushil Kumar suspended by Indian Railways after arrest; Now the job is gone | कुस्तीपटू सुशील कुमारला अटकेनंतर भारतीय रेल्वेने केले निलंबित; आता नोकरीही गेली 

कुस्तीपटू सुशील कुमारला अटकेनंतर भारतीय रेल्वेने केले निलंबित; आता नोकरीही गेली 

googlenewsNext
ठळक मुद्देसुशीलचे निलंबन २३ मे पासून लागू करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत तो निलंबित राहील.

नवी दिल्ली - कुस्तीपटू सागर धनखड खून प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटूसुशील कुमार याला पुढील आदेश येईपर्यंत रेल्वेने वरिष्ठ कमर्शियल मॅनेजर पदावरून निलंबित केले आहे. सुशीलचे निलंबन २३ मे पासून लागू करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत तो निलंबित राहील. सुशीलला कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपात  २ दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. हत्येच्या आरोपावरून सुशील कुमारविरोधात चौकशी सुरू झाल्यानंतरच रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.

'क्राईम सीन केला रिक्रिएट'
तत्पूर्वी, सुशीलला मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी क्राईम सीन रिक्रियेत करण्यासाठी छत्रसाल स्टेडियममध्ये नेले होते. पोलीस पथक सकाळी गुन्हा घडला त्या जागेवर गेले होते आणि क्राईम सीन क्रिएट करून दुपारपर्यंत परत आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचे एक पथक छत्रसाल स्टेडियममध्ये तपासासंदर्भात गेले होते. घटनेच्या दिवशी गुन्हा कोणत्या परिस्थितीत घडला हे जाणून घेण्यासाठी आणि गुन्ह्याचा क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी सुशील कुमार यालाही घटनास्थळी नेण्यात आले.

सुशीलची ४ तास चौकशी करण्यात आली
सोमवारी सुशीलवरही सुमारे ४ तास चौकशी केली गेली. अधिकाऱ्यांनीसांगितले की, ते या प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलने तपास करीत आहेत. यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की, सुशील कुमारची या घटनेची चौकशी करण्यासाठी विचारपूस केली गेली, कोणत्या परिस्थितीत हा गुन्हा कुठे झाला आणि तो घटनेनंतर कुठे गेला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. छत्रसाल स्टेडियमवर 4 ते 5 मे दरम्यान मध्यरात्री सुशील आणि त्याच्या साथीदारांवर झालेल्या हल्ल्यात २३ वर्षीय कुस्तीपटूचा मृत्यू झाला आणि त्याचे दोन मित्र जखमी झाले. या घटनेमागील कारण मॉडेल टाऊन परिसरातील एका मालमत्तेवरील वाद असल्याचे सांगितले जात आहे.

Read in English

Web Title: Wrestler Sushil Kumar suspended by Indian Railways after arrest; Now the job is gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.