यशश्री शिंदे हिचा गहाळ झालेला मोबाइल सापडला; हत्या प्रकरणाचे धागेदोरे होणार उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 13:21 IST2024-08-12T13:20:23+5:302024-08-12T13:21:26+5:30
यशश्री हिच्या हत्येनंतर आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी कर्नाटक (गुलबर्गा) येथून अटक केली

यशश्री शिंदे हिचा गहाळ झालेला मोबाइल सापडला; हत्या प्रकरणाचे धागेदोरे होणार उघड
मधुकर ठाकूर, लोकमत न्यूज नेटवर्क, उरण: येथील यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी हा पोलिस कोठडीत आहे. यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाइल गहाळ झाला होता. आता हा मोबाइल पोलिसांच्या हाती लागला असून, या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येणार आहेत.
यशश्री हिच्या हत्येनंतर आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी कर्नाटक (गुलबर्गा) येथून अटक केली आहे. त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पाच वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये मोबाइलवरून संपर्क होता, अशी कबुली आरोपीने दिली आहे. मात्र, यशश्री हिचा मोबाइल गहाळ झाला होता. आता हा मोबाइल सापडला आहे.
तपासणी व डाटा मिळविण्यासाठी यशश्रीचा मोबाइल लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. मंगळवारी आरोपीची पोलिस कस्टडी संपणार आहे. आरोपी तपासात सहकार्य करत असल्याचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल नेहूल यांनी सांगितले.