पिता-पुत्रांनी केल्या ३० घरफोड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 04:20 AM2018-11-09T04:20:16+5:302018-11-09T04:20:33+5:30

वाटमारीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत तब्बल ३० गुन्हे उघड झाले.

yavatmal crime News | पिता-पुत्रांनी केल्या ३० घरफोड्या

पिता-पुत्रांनी केल्या ३० घरफोड्या

Next

यवतमाळ - वाटमारीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत तब्बल ३० गुन्हे उघड झाले. इतकेच नव्हेतर उमरखेडमधील पिता-पुत्राची अट्टल टोळी जेरबंद करून १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. यवतमाळ, उमरखेड, पुसद, महागाव या शहरामध्ये घरफोडी करणारी पिता-पुत्राची टोळी स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या हाती लागली. पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके पोफाळी पोलीस ठाण्यातंर्गत झालेल्या वाटमारीच्या गुन्ह्याचा तपास करताना अनिल दगडू काळे (३१) रा. आठवडी बाजार उमरखेड याला ३१ आॅक्टोबर रोजी अटक केली. त्याने पोलिसांचा बाजीराव पडताच यापूर्वी केलेल्या संपूर्ण गुन्ह्यांची कबुली दिली.




मुख्य सूत्रधार अविनाश प्रकाश चव्हाण (२७), आकाश प्रकाश चव्हाण व त्यांचा पिता प्रकाश शेखर चव्हाण (५५) तिघेही रा. सिंचन कॉलनी उमरखेड , विकास भगाव बन (२१) रा. झाडगाव ता. उमरखेड अशी आरोपींची नावे आहेत. प्रकाश चव्हाण हा उमरखेड सिंचन विभागात चालक म्हणून कार्यरत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्य पणाला लावून या आरोपींकडून १६ लाख ७४ हजार रुपयांचे ४५७ ग्रॅम सोने, एक किलो ६० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. याशिवाय आरोपीने गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतूस, रोख ५० हजार रूपये असा १९ लाख ४ हजार ६८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके करत असल्याची माहिती एसपी एम. राज कुमार यांनी दिली.
पत्रपरिषदेला अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख मुकुंद कु लकर्णी उपस्थित होते. या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक सूरज बोंडे, संदीप चव्हाण, फौजदार संतोष मनवर, नीलेश शेळके, सहायक फौजदार साहेबराव राठोड, ओमप्रकाश यादव, जमादार गोपाल वास्टर, मुन्ना आडे, विशाल भगत, हरीश राऊत, मोहम्मद ताज मोहम्मद जुनेद, सतीश गजभिये, सुरेंद्र वाकोडे यांनी सहभाग घेतला.

Web Title: yavatmal crime News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.