वर्धेच्या बँक दरोड्यातील 'मास्टर माईंड' यवतमाळचा; चार आरोपींना मुद्देमालासह अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 10:36 PM2020-12-17T22:36:46+5:302020-12-17T22:38:37+5:30

नऊ किलो सोनं हस्तगत

Yavatmal's 'mastermind' in Wardha bank robbery; Four accused arrested with issue | वर्धेच्या बँक दरोड्यातील 'मास्टर माईंड' यवतमाळचा; चार आरोपींना मुद्देमालासह अटक

वर्धेच्या बँक दरोड्यातील 'मास्टर माईंड' यवतमाळचा; चार आरोपींना मुद्देमालासह अटक

googlenewsNext

यवतमाळ: वर्धा येथील फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकून नऊ किलो सोने लंपास केले होते. ही घटना सकाळी ९ वाजता घडली. वर्धा पोलिसांना तेथील व्यवस्थापकावरच संशय आला. त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. यामध्ये दरोड्याचा मास्टर माईंड यवतमाळातील असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यातील चार आरोपींना यवतमाळलगतच्या करळगाव घाटातून मुद्देमालासह अटक केली.

वर्धेतील मुथ्थू फायनान्समध्ये व्यवस्थापक असलेला महेश श्रीरंगे हा मूळचा यवतमाळातील आहे. त्यानेच आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने दरोड्याचा कट रचला. महेशवर यवतमाळातील अवधूतवाडी पोलीस ठाण्यात श्रीराम फायनान्ससह तेथील ग्राहकांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहे. त्याने बनावट सोने तारण ठेवून ग्राहकांचे खरे सोने लंपास केल्याचा ठपका आहे. त्यानंतर तो यवतमाळसोडून वर्धेत स्थायिक झाला. मात्र तेथेही त्याने फायनान्स कंपनीत उलटफेर करणे सुरू केले.

दरोड्याचा कट आखताना त्याने यवतमाळातील भूखंड घोटाळ्यातील आरोपी मनीष गोळवे याला सोबत घेतले. याशिवाय फार्मासिस्ट असलेला आगाशे याला सोबत घेतले. मोठी रक्कम हाती लागणार, असे सांगून बेरोजगार असलेल्या इतर दोन युवकांना कटात सामील करून घेतले. ठरल्याप्रमाणे महेशच्या इशाऱ्यावरून मनीष गोळवे व त्याच्या तीन साथीदारांनी दरोड्याचा कट रचला. सकाळी ९ वाजता वर्धेतील कार्यालयात सशस्त्र दरोडा घातल्याचे दाखविण्यात आले.

सुरुवातीला तीन किलो सोने चोरी गेल्याचे रेकॉर्डवर आले होते. पोलिसांनी व्यवस्थापक महेश याची झाडाझडती घेतली असता नेमका प्रकार त्यांच्या लक्षात आला. एलसीबीच्या पथकाने थेट यवतमाळ गाठले व लोकेशनवरून करळगाव घाटात चौघांनाही रंगेहात पकडले. त्यांच्याजवळचा मुद्देमाल पाहून पोलिसांचेही डोळे विस्फारले. तब्बल नऊ किलो सोने या चौघांनी लुटले होते. काही तासातच वर्धा पोलिसांना मोठ्या घटनेचा उलगडा करण्यात यश आले.

आरोपीत भूखंड माफीया, फार्मासिस्ट

आर्थिक परिस्थितीने त्रस्त असलेल्यांना एकत्र घेत महेश श्रीरंगे याने दरोड्याचा कट रचला. यात यवतमाळात भूखंडाच्या गुन्ह्यातील मनीष तसेच फार्मासिस्ट असलेला आगाशे यांनी पुढाकार घेतला. सोबतीला इतर दोन नवख्या तरुण बेरोजगारांना घेतले. त्यानंतर त्यांनी दरोडा घातल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

Web Title: Yavatmal's 'mastermind' in Wardha bank robbery; Four accused arrested with issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.