प्रांताधिकाऱ्याची महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी, अखेर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 12:51 PM2021-08-17T12:51:29+5:302021-08-17T12:59:55+5:30
येवला येथील प्रांताधिकारी सोपान सुतार यांनी बदलीस पात्र नसतानाही नियम मोडून महिला तलाठ्याची बदली केली होती. या बदलीविरोधात महिला तलाठ्याने मॅट कोर्टात धाव घेतली.
नाशिक - जिल्ह्यातील येवला येथील प्रांताधिकाऱ्याने महिला तलाठ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याने तहसिल आणि महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पीडित महिलेनं याबाबत एक व्हिडिओ बनवून भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांना पाठवला होता. त्यानंतर, चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारला जाब विचारला होता. याप्रकरणी आता गुन्हा नोंद झाला आहे.
येवला येथील प्रांताधिकारी सोपान सुतार यांनी बदलीस पात्र नसतानाही नियम मोडून महिला तलाठ्याची बदली केली होती. या बदलीविरोधात महिला तलाठ्याने मॅट कोर्टात धाव घेतली. त्यावर, 23 ऑगस्टपर्यंत या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडेही महिलेने तक्रार केली होती. महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन आता संबंधित प्रांताधिकाऱ्याविरुद्ध विनयभंग आणि दमदाटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मायबाप सरकार…पहा काय चाललयं आपल्या राज्यात..
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 16, 2021
हा VDO येवल्यातील तलाठी ताईंचा आहे
उपविभागीय अधिकार्याने या तलाठीताईंकडे शरीरसुखाची मागणी केली तिने ती नाकारल्यावर तिला काय सहन करावं लागतयं ते ऐका @CMOMaharashtra@bb_thorat@ChhaganCBhujbal@Dev_Fadnavis@mipravindarekarpic.twitter.com/DFUv1y92qP
महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. त्यामुळे, पीडिताने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. कासार यांनी 3 ऑगस्ट रोजी आपल्या घऱी बोलावून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, विरोध केल्यामुळेच त्यांनी आपणास नोटीस पाठवली. तसेच, आपली विभागीय चौकशी का करु नये, याचा खुलासा मागितला. त्यांच्या नोटीसीला उत्तर दिल्यानंतरही त्यांनी आपली बदली केल्याचे पीडिताने तक्रीरीत म्हटले आहे.