बहिणीची छेड काढल्याच्या वादातून तीक्ष्ण हत्याराने वार करून एकाचा खून : येरवड्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 11:56 AM2019-06-28T11:56:44+5:302019-06-28T11:58:19+5:30

येरवड्यात बहिणीची छेड काढली म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या एकाचा तीक्ष्ण हत्यारानेवार करून खून करण्यात आला आहे.

Yerwada incidents : one murder by sharp weoapn due to sister molestation | बहिणीची छेड काढल्याच्या वादातून तीक्ष्ण हत्याराने वार करून एकाचा खून : येरवड्यातील घटना

बहिणीची छेड काढल्याच्या वादातून तीक्ष्ण हत्याराने वार करून एकाचा खून : येरवड्यातील घटना

googlenewsNext

पुणे : येरवड्यात बहिणीची छेड काढली म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या एकाचा तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना गुरूवारी रात्री घडली. आदर्श जगन्नाथ काकडे (वय 24) (रा. शेलार चाळ येरवडा) या सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला असून याप्रकरणी जगन्नाथ तुकाराम काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, याप्रकरणी राजू साठे,सीमा साठे,शुभम साठे,अनिकेत साठे,रोहित साठे,ऋतिक साठे, रोनक चव्हाण व अजय जंगले या आठ जणांना येरवडापोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसार, आदर्श हा त्याच्या मावस बहिणीची छेड काढली म्हणून ऋतिक याला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. याठिकाणी आदर्श याला राजू साठे व त्याच्या कुटुंबियांनी मारहाण केली. यात आदर्श याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. उपचारापुर्वीच त्याचा झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी आठ जणांना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास येरवड्यात शेलार चाळ येथील सार्वजनिक शौचालयजवळ एकावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याची माहिती पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती. 
 येरवडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आदर्श काकडे याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.  
आदर्श काकडे याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.  येरवडा पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील तो गुन्हेगार होता. अधिक तपास तपास पोलिस निरीक्षक अजय वाघमारे करत आहेत.

Web Title: Yerwada incidents : one murder by sharp weoapn due to sister molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.