Yes Bank Case: वाधवान कुटुंबीयांची क्वारंटाईनमधून मुक्तता, सीबीआय करू शकते अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 07:32 PM2020-04-22T19:32:29+5:302020-04-22T19:35:51+5:30

Yes Bank Case : आज दुपारी त्यांना क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले असून आता वाधवान बंधूंना सीबीआय अटक करू शकते.  

Yes Bank Case: Wadhwan's family released from quarantine, CBI may make arrest pda | Yes Bank Case: वाधवान कुटुंबीयांची क्वारंटाईनमधून मुक्तता, सीबीआय करू शकते अटक

Yes Bank Case: वाधवान कुटुंबीयांची क्वारंटाईनमधून मुक्तता, सीबीआय करू शकते अटक

Next
ठळक मुद्देमहाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भा. दं. वि.  कलम १८८ अन्वये आणि कलम १४४ अंतर्गत याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.गेल्या १५ दिवसांपासून त्यांना एका हायस्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं.


मुंबई - कोरोनाचे भयंकर संकट वाढत असल्याने लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असताना नियमांची पायमल्ली करत वाधवान कुटुंबियांनी मुंबई, खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट घेणाऱ्या दीवान हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (डीएचएफएल) प्रवर्तक, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भा. दं. वि.  कलम १८८ अन्वये आणि कलम १४४ अंतर्गत याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच २३ जणांना क्वारंटाईन करण्यात होते. आज दुपारी त्यांना क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले असून आता वाधवान बंधूंना सीबीआय अटक करू शकते.  


वाधवान यांच्यावर आयपीसी १८८, २६९, २७०, ३४ त्याच बरोबर आपत्कालिन व्यवस्थानच्या कलम ५१ बी तसेच कोविड १९ च्या कलम ११ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे डीएचएफएल कंपनी आणि येस बँक घोटाळा प्रकरणात जामिनावर असलेल्या बंधू धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांना कुटुंबाच्या आपत्कालीन परिस्थितीचे कारण सांगून खंडाळ्याहून महाबळेश्वरकडे जाण्यास परवानगी मिळाली होती. चौकशीत धक्कादायक बाब उघड झाली होती. अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती त्यांच्यापुढे निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे संचारबंदीच्या कलम १४४चा भंग केला आहे. तसेच लॉकडाऊन काळात जाहीर करण्यात आलेले कलम १८८ चे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर महाबळेश्वर पोलिसांनी वाधवान कुटुंबियांसह २३ जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला .

आज वाधवाना प्रकरणावरही गृहमंत्राची देशमुख फेसबुकच्या माध्यमातून बोलले, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या फार मोठ्या चुकीमुळे वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली. त्या वाधवान कुटुंबाचा आज दुपारी २ वाजता क्वारंटाइनची वेळ संपतेय. त्यामुळे पोलीस खात्याकडून ईडी आणि सीबीआय यांना पत्र लिहून कळवलं आहे. आज दुपारी २ नंतर वाधवान कुटुंबाला ताब्यात घ्यावं. सीबीआयचे अधिकारी जो पर्यंत वाधवान कुटुंबाला ताब्यात घेत नाही तोपर्यंत ते आमच्या ताब्यात असतील. गेल्या १५ दिवसांपासून त्यांना एका हायस्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. राज्य शासन कोणत्याही परिस्थितीत वाधवान कुटुंबाला पाठीशी घालत नाही असं स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते.

Web Title: Yes Bank Case: Wadhwan's family released from quarantine, CBI may make arrest pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.