येस बँक घोटाळा; ईडीने दाखल केले आरोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:35+5:302021-04-02T04:24:07+5:30
Yes Bank scam : येस बँकेतील ४१० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ओमकार डेव्हलपर्सच्या प्रमोटर विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
मुंबई : येस बँकेतील ४१० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ओमकार डेव्हलपर्सच्या प्रमोटर विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. ओमकार बिल्डर्सचे प्रमोटर बाबुलाल वर्मा, कमल किशोर गुप्ता, अभिनेता सचिन जोशी व अन्य यांच्या विरोधामध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ओमकार डेव्हलपर्सने झोपडपट्टी विकास योजनेखाली बँकेकडून मोठे कर्ज
घेतले व नंतर ते अन्य कामांकडे परिवर्तित केल्याचे आरोपपत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
औरंगाबाद पोलिसांनी दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार
वर्मा आणि गुप्ता यांना २७ जानेवारी , २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे.
मुंबई शहराच्या वडाळा भागातील एका झोपडपट्टी विकास प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या कर्जाची रक्कम या प्रवर्तकांनी अन्यत्र वापरल्याचे हे प्रकरण आहे.