Yes bank घोटाळ्याप्रकरणी राणा कपूरला जोरदार दणका; 2200 कोटींची संपत्ती जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 08:48 PM2020-07-09T20:48:05+5:302020-07-09T20:51:56+5:30
येस बँकेचे राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून ६०० कोटी रुपये मिळाले होते, याची ईडी चौकशी करीत आहे.
मुंबई - Yes Bank घोटाळा प्रकरणी अंमलबाजवणी संचालनालयाने (ED) बँकेचे सहसंस्थापक आणि आरोपी राणा कपूर यांना कारवाईचा मोठा दणका दिला आहे. राणा कपूर आणि कुटुंबीयांच्या मालकीची तब्बल 2200 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. DHFL चे प्रमोटर कपिल आणि धीरज वाधवान यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या संपत्तीवरही टाच आणली आहे. राणा कपूर यांची कंबाला हिल येथील इमारत, नेपियन्सी रोडवरील ३ डुप्लेक्स, वरळी आणि मुंबई परिसरातील ८ फ्लॅट्स तसेच नवी दिल्लीतील अम्रित शेरगील मार्गावरील संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
दुसऱ्या एका आर्थिक घोट्याळ्याच्या केसमध्ये वाधवान बंधू आधीच CBI च्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. कपिल आणि धीरज वाधवान यांची मुंबईतील खारमधील १२ फ्लॅट्स, लंडनमधील २ फ्लॅट्, ऑस्ट्रेलियामधील संपत्ती, मुळशी आणि पुण्यातील जमिनी ५ आलिशान गाड्या ईडीने जप्त केली असून ३४४ बँक अकाऊंटवर जप्ती आणली आहे. दरम्यान येस बँकेच्या राणा कपूरच्या मालकीची मुंबई, पुण्यासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि यूकेमध्ये असणारी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
येस बँकेचे राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून ६०० कोटी रुपये मिळाले होते, याची ईडी चौकशी करीत आहे. ३०००० कोटींअधून अधिक रक्कम कर्ज म्हणून बेकायदेशीरपणे मंजूर केल्याचा राणा कपूर यांच्यावर आरोप आहे. २००४ मध्ये त्यांनी येस बँक स्थापन केली आणि २०१९ पर्यंत ते बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ होते. याच काळात पैशांची अफरातफर झाली आहे. येस बँकेनं DHFLला ३७५० कोटी रुपये आणि DHFLच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना ७५० कोटींचे कर्ज दिलं.
ED attaches under PMLA a building at Cumbala Hill, 3 duplex at Napean Sea Road, flat at Nariman Point,8 flats in Worli, in Mumbai & property in Amrita Shergill Marg, New Delhi totaling to Rs.792 crore( having value Rs.1400 crore) of Rana Kapoor and oth in #yesbankfraud case
— ED (@dir_ed) July 9, 2020
ED attaches under PMLA, 12 flats in Khar, Mumbai, flat in New York, 2 flats in London, property in Australia, 2 land Parcels in Pune and Mulshi, 5 Luxury Vehicles and 344 bank accounts totaling to Rs. 1411.9 crore of Kapil Wadhawan, Dheeraj Wadhawan & oth in #yesbankfraud case.
— ED (@dir_ed) July 9, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर
पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य
किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ
मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...