योगी सरकार २.०! कानपूर पोलिसांची पहिली चकमक, हिस्ट्रीशीटर ढाब्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 10:02 PM2022-03-29T22:02:11+5:302022-03-29T22:09:55+5:30

Emcounter Case : रात्री उशिरा त्याची नबाबगंज परिसरात पोलिसांत चकमक झाली. ज्यामध्ये त्याच्या पायाला गोळी लागली.

Yogi government 2.0! First encounter of Kanpur police, history shiter Dhaba arrested | योगी सरकार २.०! कानपूर पोलिसांची पहिली चकमक, हिस्ट्रीशीटर ढाब्याला अटक

योगी सरकार २.०! कानपूर पोलिसांची पहिली चकमक, हिस्ट्रीशीटर ढाब्याला अटक

Next

योगी सरकार 2.0 मध्ये झिरो टॉलरन्सच्या संदर्भात, कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी पोलिसांनी गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्धची कारवाई तीव्र केली आहे. याच अनुषंगाने कानपूरमध्ये पोलिसांनी एन्काउंटर केला. ज्यामध्ये हिस्ट्री शीटर संजय उर्फ ​​ढाबा हा एन्काउंटरचा पहिला बळी ठरला. ढाब्यावर डझनभराहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. रात्री उशिरा त्याची नबाबगंज परिसरात पोलिसांत चकमक झाली. ज्यामध्ये त्याच्या पायाला गोळी लागली.

पोलिसांनी ढाब्याजवळून एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. डीसीपी पश्चिम बीबीजीटीएस मूर्ती यांनी या चकमकीबाबत दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात कानपूरमध्ये अशीच पोलिस चकमक मोहीम राबवण्यात आली होती. गैरप्रकार वारंवार घडत होते. ज्यामध्ये सुमारे शंभर गुन्हेगारांवर गोळीबार करण्यात आला होता. आता दुसरी मोहीम सुरू होताच कानपूरच्या गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुंडांवर गोळीबार केला

DCP बीबीजीटीएस मूर्ति  यांनी सांगितले की, SWOT टीम आणि पोलिस स्टेशन नवाबगंज यांच्याकडून रात्री उशिरा गंगा बॅरेज ते बिथूर रोडपर्यंत वाहनांची तपासणी केली जात आहे. तेवढ्यात मोटारसायकलवरून दोघेजण येताना दिसले. तपासणी करणाऱ्या पोलिस पथकाने त्यांना अडवले असता ते मोटारसायकलवरून पळू लागले. संशयाच्या आधारे त्यांचा पाठलाग करण्यात आला. पोलिस पाठलाग करत असल्याचे पाहून हल्लेखोरांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांची गोळी मोटारसायकलस्वार चोरट्याच्या पायाला लागली आणि तो तिथेच पडला. दरम्यान, त्याचा दुसरा साथीदार अंधारात पळून गेला. संजय उर्फ ​​ढाबा असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

Web Title: Yogi government 2.0! First encounter of Kanpur police, history shiter Dhaba arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.