योगीच येणार! मिर्झापूरमध्ये गुजरात पोलीस म्हणाला, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 07:03 PM2022-03-07T19:03:16+5:302022-03-07T19:04:47+5:30

Video Viral : हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मिर्झापूर पोलिसांनी या पोलीस कर्मचाऱ्याला ड्युटीवरून हटवले. तसेच कारवाई करण्यास सांगितले.

Yogi will come! In Mirzapur, Gujarat police said action was taken after the video went viral | योगीच येणार! मिर्झापूरमध्ये गुजरात पोलीस म्हणाला, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

योगीच येणार! मिर्झापूरमध्ये गुजरात पोलीस म्हणाला, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

Next

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी उत्तर प्रदेश पोलिसांसोबतच बाहेरूनही फौजफाटा बोलवण्यात आला आहे. यामध्ये गुजरातमधून मिर्झापूरला आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका वृद्धाशी बोलत असताना तो फक्त योगी येणार असल्याचे सांगत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मिर्झापूर पोलिसांनी या पोलीस कर्मचाऱ्याला ड्युटीवरून हटवले. तसेच कारवाई करण्यास सांगितले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा एक भाग म्हणून, मिर्झापूरच्या पाच विधानसभांमध्येही सोमवारी मतदान होत आहे. दरम्यान, शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी एक ट्विट केले आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गुजरात पोलिसांचा एक कॉन्स्टेबल पोलिस बस पास करण्यासाठी इतर वाहने बाजूला करत आहे. दरम्यान, बसमध्ये बसलेला एक पोलीस रस्त्यावर उभ्या असलेल्या एका वृद्धाशी बोलत असताना म्हणतो की, गुजरातचे लोक थोडे विरोधात आहेत. यावर वृद्ध म्हणतो की, विरोधात का असू नये. नंतर योगीच यूपीत येणार असल्याचे पोलीस सांगतो. वृद्ध पुढे म्हणतो म्हणून तुम्ही आला आहेत का? यावर शिपाई म्हणतो की, हो म्हणूनच तो आला आहे आणि हसायला लागतो.

योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मिर्झापूर-वाराणसी रस्त्यावरील नारायणपूरजवळ ६ मार्चचा आहे. योगेंद्र यादव यांनी हा व्हिडिओ ट्विट करत निवडणूक आयोगाला सवाल केला आहे. मिर्झापूर पोलिसांनी ट्विट केले की, कॉन्स्टेबलला ड्युटी पॉईंटवरून हटवण्यात आले आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. एएसपी सिटी संजय कुमार वर्मा यांनी सांगितले की, गुजरात पोलिसांच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांचे कमांडंट संबंधित पोलिसावर कारवाई करत आहेत.

दावा भ्रामक आहे 

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये निवडणूक ड्युटीसाठी गुजरात पोलीस तैनात करण्यात आल्याचा दावा एका ट्विटमध्ये केला जात आहे. #PIBFactCheck या ट्विटर अकाऊंटवरून हा दावा दिशाभूल करणारा आहे. तसेच गुजरात पोलिसांची कोणतीही तुकडी निवडणूक ड्युटीसाठी वाराणसीत आली नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे असल्याचे नमूद केले आहे.

या व्हायरल व्हिडिओवरून राजकारणही तापले आहे. यावर राजकीय पक्षांनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केले आहेत. असेही बोलले जात आहे की, यूपी निवडणुकीत गुजरात पोलीस काय करत आहेत? मिर्झापूर येथील कच्छवन येथील माजी माध्यमिक शाळा व प्राथमिक शाळा असलेल्या मतदान केंद्रावर स्लिप न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी बीएलओला घेराव घातला. स्लिप न मिळाल्याने लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. जोगीपूर, मंगळवारी, दर्दियां, पीरखान, केवटन वॉर्डात स्लिप वाटली गेली नसल्याचा आरोप आहे. स्लिप देण्याऐवजी बीएलओने घरी ठेवल्याचा आरोप लोक करतात. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बारैणी गावात बीएलओला घेराव घातला.

Web Title: Yogi will come! In Mirzapur, Gujarat police said action was taken after the video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.