तू बांगलादेशी आहेस... ; अशी भीती दाखवून रोज केला तिच्या शरीराचा सौदा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 09:37 PM2021-12-16T21:37:16+5:302021-12-16T21:37:55+5:30
Prostitution Case : गेली अनेक महिने नरक यातना भोगल्यानंतर अखेर पीडित तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
मुंबई - २० वर्षीय तरुणीला दलालांनी एका हॉटेलात डांबून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं पीडित तरुणीला मुंबईतील नागपाडा परिसरातील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवलं होतं. तू बांगलादेशी असून तुला कधीही अटक होऊ शकते, अशी वारंवार भीती दाखवून नराधम आरोपी तिच्या शरीराचा नेहमी सौदा करत होता. गेली अनेक महिने नरक यातना भोगल्यानंतर अखेर पीडित तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
२० वर्षीय पीडित तरुणी मूळची बांगलादेशातील दादरा गावातील रहिवासी आहे. पीडित तरुणी सात वर्षांची असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. वडिलांनी अन्य एका तरुणीशी लग्न करून पीडित मुलीला वाऱ्यावर सोडलं होतं. यामुळे पीडितेच्या आजीनं अवघ्या चौदाव्या वर्षी पीडितेचे लग्न लावून दिलं. लग्नानंतर सोळाव्या वर्षी पीडित तरुणीने बाळाला जन्म दिला. मात्र, पीडितेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने त्यानेही पीडितेचा सांभाळ करणं बंद केलं. त्यामुळे आपल्या मुलीच्या संगोपनासाठी बांगलादेशी महिलेने ढाका येथे अनेक ठिकाणी काम शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही महिलांनी चांगले पैसे मिळतील, असं सांगून तिला कोलकाता याठिकाणी आणलं. भारतात आल्यानंतर निराधार तरुणीला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं. दोन वर्षे तेथे राहिल्यानंतर संबंधित तरुणी मुंबईला आली आहे.
याठिकाणी आल्यानंतर देखील तिची भेट एका सोनु कुमार नावाच्या दलालाशी झाली आणि त्याने तिला नागपाडा येथील एका हॉटेलात डांबून ठेवलं. तू बांगलादेशी आहेस, तुला कधीही अटक होऊ शकते, अशी भीती दाखवून आरोपीने गेले अनेक महिने तिच्या शरीराचे सौदे करत तिला नरकयातना देत होता. शेवटी कंटाळून ९ डिसेंबर रोजी पीडित तरुणीने डी. बी. रोड पोलीस ठाणे गाठले. तिच्यावर झालेल्या अत्याचाराची व्यथा तिने पोलिसांकडे मांडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.