आई नव्हे तू वैरीण!...म्हणून चिमुकल्या मुलींवर कुऱ्हाडीचे घाव घालून केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 03:04 PM2020-05-20T15:04:42+5:302020-05-20T15:06:58+5:30

या बातमीने परिसरातील लोक हैराण झाले आहेत. लोकांना विश्वास बसत नाहीय की केवळ चिकनची एक आई आपल्या मुलींची हत्या करू शकते. 

You are the enemy, not the mother! ... So I killed the two girls with an axe pda | आई नव्हे तू वैरीण!...म्हणून चिमुकल्या मुलींवर कुऱ्हाडीचे घाव घालून केली हत्या 

आई नव्हे तू वैरीण!...म्हणून चिमुकल्या मुलींवर कुऱ्हाडीचे घाव घालून केली हत्या 

Next
ठळक मुद्दे या घटनेत एका आईने इतका नशा केली की तिला कल्पनाच नव्हती तिने किती टोकाचं पाऊल उचललं आहे.तिला इतका राग आला की कुऱ्हाड घेऊन  खोली गाठली आणि हिरामती ( ५ ) आणि सरस्वती ( ४ ) या दोन्ही मुलींची हत्या घेतला.

रायपूर - भारतीय समाजात असे म्हटले जाते की, मुलगा कुपुत्र असू शकतो, परंतु आई कुमाता नसू शकते. परंतु छत्तीसगडच्या सूरजपुरात अशी एक घटना घडली आहे ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. या घटनेत एका आईने इतका नशा केली की तिला कल्पनाच नव्हती तिने किती टोकाचं पाऊल उचललं आहे. नशेच्या अवस्थेत या आईने घरी मुलींना सांगितले की, तिला खाण्यासाठी चिकन हवे आहे. मागणी पूर्ण न झाल्याने महिलेने आपल्या मुलींना कुऱ्हाडीने कापले. या बातमीने परिसरातील लोक हैराण झाले आहेत. लोकांना विश्वास बसत नाहीय की केवळ चिकनची एक आई आपल्या मुलींची हत्या करू शकते. 


सूरजपूर जिल्ह्यातील प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविलास हा पत्नी आणि दोन मुलींसोबत टिकरा गावात राहतो. सोमवारी कविलास यांनी आठवडे बाजारातून भाज्या आणि कोंबडीची खरेदी केली. त्या संध्याकाळी घरी कोंबडी शिजली गेली. संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांनी रात्रीचे जेवण केले. मुली खोलीत झोपायला गेल्या, त्यानंतर कविलास आणि त्यांची पत्नी राम बाई यांनी दारू पिण्यास सुरुवात केली.

दारू पिताना राम बाईने चिकन खाण्याची इच्छा व्यक्त केली. तिने चिकनसाठी मुलींना आवाज दिला. पण तोपर्यंत दोन्ही मुली झोपल्या होत्या. थोड्या वेळाने कविलासही मद्यपान करून झोपी गेला. यानंतर आरोपी महिलेने घरात पाळलेल्या चार कोंबड्या मारल्या. यानंतर, मुलींनी तिच्या स्वयंपाकाला मदत करण्यासाठी आवाज देणे सुरू केले. मुली झोपल्या होत्या. यावर तिला इतका राग आला की कुऱ्हाड घेऊन  खोली गाठली आणि हिरामती ( ५ ) आणि सरस्वती ( ४ ) या दोन्ही मुलींची हत्या घेतला.

मुलींचा बळी घेतल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत तिने काय केले हे त्या महिलेला समजले. पती कविलास जागे झाल्यावर त्यांनी प्रेमनगर पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना संपूर्ण प्रकरण सांगितले. कविलास यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्यांची पत्नी राम बाईविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्यासोबतच पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

कोरोना लसीच्या बहाण्याने ४ जणांना विष पाजलं; अनैतिक संबंधातून कुटुंबाला संपवण्याचा डाव

 

बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट

 

धक्कादायक! आश्रमात महिलांना बंदी बनवलं; बलात्काराच्या आरोपाखाली २ महंतांना अटक

 

Lockdown 4.0 : लॉकडाऊनमध्ये बेकायदा प्रवासी वाहतूक; बसचा भीषण अपघात

Web Title: You are the enemy, not the mother! ... So I killed the two girls with an axe pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.