'शेतकामावर येत नाहीस, गाडी घेऊन फिरतोस'; युवकास मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 05:25 PM2019-12-05T17:25:55+5:302019-12-05T17:33:04+5:30

आमच्या शेतामध्ये कामाला का येत नाहीस? तेव्हा गावात गाडी घेवून का फिरतोस?

'You don't come to work and get off with a bike'; Atrocity against nine people who beat a teenager | 'शेतकामावर येत नाहीस, गाडी घेऊन फिरतोस'; युवकास मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी

'शेतकामावर येत नाहीस, गाडी घेऊन फिरतोस'; युवकास मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी

Next

बिलोली : शेतीच्या कामाला का येत नाहीस? असे म्हणून  जातीवाचक शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याची घटना नायगाव तालुक्यातील होटाळा येथे घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायगाव तालुक्यातील नरसी येथे गणेश अशोक कोत्तेवार यांना ३० नोव्हेंबर रोजी अडवून गावातील नऊ जणांनी तू आमच्या शेतामध्ये कामाला का येत नाहीस? तेव्हा गावात गाडी घेवून का फिरतोस? तसेच निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करता का? असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच काठीने व दगडाने मारहाण केली. यावेळी गणेश कोत्तेवार यांची आई तेथे असताना त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. यात त्या जखमी झाल्या. याप्रकरणी गणेश कोत्तेवार यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 

या तक्रारीवरुन अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत माधव दिगांबर पवार, संदीप दत्तात्रय पवार, योगेश दादाराव पवार, योगेश वसंत पवार, बाळू देवराव पवार, माधव दिगांबर उमरेकर, मोहन तुकाराम पवार, दिगंबर राहुल पवार, गणेश व्यंकटराव पवार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ हे करीत आहेत. 

या घटनेतील मारहाणीत जखमी झालेल्या गणेश कोत्तेवार यांच्यावर नायगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. होटाळा प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी सांगितले.

Web Title: 'You don't come to work and get off with a bike'; Atrocity against nine people who beat a teenager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.