आजारी वडिलांवर उपचार करण्यासाठी मुलगा बनला चोर, एका घरातून लंपास केले लाखो रूपयांचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 12:56 PM2023-03-01T12:56:26+5:302023-03-01T12:57:06+5:30

Crime News : व्यक्तीने चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत 92 लाख रूपये सांगितलं होती. पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली.

Young man arrested for stealing to pay for fathers treatment in Dombivali | आजारी वडिलांवर उपचार करण्यासाठी मुलगा बनला चोर, एका घरातून लंपास केले लाखो रूपयांचे दागिने

आजारी वडिलांवर उपचार करण्यासाठी मुलगा बनला चोर, एका घरातून लंपास केले लाखो रूपयांचे दागिने

googlenewsNext

Crime News : चोर हे कधीच ईच्छेने चोरी करत नाहीत त्यांच्यावर तशी वेळ येते म्हणून ते गुन्हे करतात. ठाणे शहरात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली ज्याने आपल्या वडिलांवर उपचार करण्यासाठी चोऱ्या केल्या. ही घटना विष्णुनगरातील आहे. एक न्यूज एजन्सीनुसार, गेल्या आठवड्यात एक व्यक्तीने तक्रार दाखल केली होती की, त्याच्या घरातून लाखो रूपयांचे दागिने चोरी गेले.

व्यक्तीने चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत 92 लाख रूपये सांगितलं होती. पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली. पोलिसांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले तेव्हा त्यात चोर येताना दिसला. लवकरच चोराची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

चोरी करणाऱ्या व्यक्तीची ओळख वैभव मुरबदे म्हणून पटली. तो मुरबाडचा राहणारा आहे. चौकशी केल्यावर त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याचे वडील आजारी आहेत. उपचारावर लाखो रूपये खर्च होत आहेत. पण त्याच्याकडे इतके पैसे नव्हते. त्यामुळे तो चोर बनला. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले दागिने ताब्यात घेतले.

दरम्यान, याआधी औरंगाबादमधून चोरीची एक अजब घटना समोर आली. इथे चोरांनी मंदिरात चोरी करण्याआधी देवाची पूजा केली आणि नंतर चोरी केली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. व्हिडिओत दिसलं की, चोरांनी चोरी करण्याआधी देवाची पूजा केली आणि त्यानंतर दानपेटी फोडली.

औरंगाबादच्या पाचपीरवाडी गावातील ही घटना आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, चोर आधी गर्भगृहात प्रवेश करतात आणि नंतर देवाची पूजा करतात, देवाला फुलं वाहतात. पूजा केल्यावर ते दानपेटी फोडतात आणि पैसे चोरी करतात. पोलिसांना या घटनेची सूचना दिली गेली आहे.

Web Title: Young man arrested for stealing to pay for fathers treatment in Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.