“साहेब, प्रेयसीनं धोका दिला, आता रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करायला चाललोय”; पोलिसांना आला फोन, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 03:46 PM2021-03-13T15:46:01+5:302021-03-13T15:52:59+5:30

साहेब, प्रेयसीने धोका दिलाय.. मी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी जात आहे, ही माहिती मिळताच पोलिसांनी कंट्रोल रुममधून नगरच्या पोलीस निरीक्षक रविंद्र सिंह यांना माहिती दिली

Young Man Calls Police And Says Girlfriend Cheated I Am Going To Suicide On Railway Track In Amroha | “साहेब, प्रेयसीनं धोका दिला, आता रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करायला चाललोय”; पोलिसांना आला फोन, त्यानंतर...

“साहेब, प्रेयसीनं धोका दिला, आता रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करायला चाललोय”; पोलिसांना आला फोन, त्यानंतर...

googlenewsNext
ठळक मुद्देस्वत: पोलीस अधिकाऱ्याने फोनवरून प्रियकराला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो आत्महत्या करण्यावर ठाम राहिला.जेव्हा त्या प्रियकराला पकडलं तेव्हा तो नशेत होता, त्याला स्वत:ला सावरणंही कठीण होतंया प्रियकराला टीपी नगर पोलीस ठाण्यात नेलं, त्याची समस्या जाणून घेतली, हा युवक मुलीसोबत लग्न करू इच्छित होता

अमरोहा – साहेब, प्रेयसीने धोका दिलाय..मी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करायला चाललोय, तुमचा फोन होल्डवर ठेवा, ट्रेन येताच मी उडी मारेन, ही वाक्य नशेत धुंद असलेल्या एका प्रियकराची आहेत, हा फोन येताच पोलीस ठाण्यात खळबळ माजली, तातडीनं पोलिसांनी चक्र फिरवली अन् ट्रेनसमोर उडी मारण्यापूर्वीच प्रियकराला ताब्यात घेण्यास यश मिळालं.

पोलिसांनी या प्रियकराला ताब्यात घेऊन पोलीस चौकीला आणलं, येथे त्याने आपली समस्या पोलिसांना सांगितली, प्रेयसीला मी ५० रुपये आणि काजू-मनुके दिले होते, परंतु तिला ते कमी वाटले आणि मला सोडून गेली, पोलिसांनी प्रियकराला आता त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलं आहे. हे प्रकरण अमरोहा जिल्ह्यातील नगर कोतवाली परिसरातील आहे, याठिकाणी राहणाऱ्या एका युवकाचं शेजारच्या परिसरातील मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरु होतं, शुक्रवारी रात्री १ वाजता त्याने ११२ नंबर डायल करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली.

या फोनमध्ये प्रियकर म्हणाला की, साहेब, प्रेयसीने धोका दिलाय.. मी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी जात आहे, ही माहिती मिळताच पोलिसांनी कंट्रोल रुममधून नगरच्या पोलीस निरीक्षक रविंद्र सिंह यांना माहिती दिली, स्वत: पोलीस अधिकाऱ्याने फोनवरून प्रियकराला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो आत्महत्या करण्यावर ठाम राहिला. त्याने अधिकाऱ्याला सांगितले तुम्ही फोन होल्डवर ठेवा, मी ट्रेनसमोर उडी मारत आहे असं सांगत प्रियकराने फोन ठेवला, त्यानंतर पोलीस अधिकारी आणि ११२ च्या कर्मचाऱ्यांनी चक्र फिरवली, थोड्याच वेळात या युवकाला रेल्वे स्टेशनच्या जवळ सुखरूप पकडण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, जेव्हा त्या प्रियकराला पकडलं तेव्हा तो नशेत होता, त्याला स्वत:ला सावरणंही कठीण होतं, त्यानंतर पोलिसांनी या प्रियकराला टीपी नगर पोलीस ठाण्यात नेलं, त्याची समस्या जाणून घेतली, हा युवक मुलीसोबत लग्न करू इच्छित होता असं अधिकाऱ्याने सांगितले, ५०० रुपये, काजू आणि मनुके मुलीला दिल्यानंतर तिने हे खूप कमी आहे असं सांगत ते पैसे आणि काजू प्रियकराच्या अंगावर फेकून दिले, त्यामुळे दुखी झालेल्या युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या पोलिसांनी या युवकाला त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिलं आहे.

 

Web Title: Young Man Calls Police And Says Girlfriend Cheated I Am Going To Suicide On Railway Track In Amroha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस