अकोटात देशी कट्टा, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 02:32 PM2018-08-20T14:32:44+5:302018-08-20T14:36:10+5:30
अकोट (जि. अकोला) : कोणत्याही वैध परवानाविना देशी कट्टा व जीवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणास अकोट शहर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली.
अकोट (जि. अकोला) : कोणत्याही वैध परवानाविना देशी कट्टा व जीवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणास अकोट शहर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. श्याम उर्फ स्वप्नील पुरुषोत्तम नाठे (२०, रा. रामटेक पुरा, अकोट) असे या तरुणाचे नाव आहे.
स्थानिक कबूत्तरी मैदान येथे एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अकोट शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गवई,पोलिस कर्मचारी संजय घायल, उमेश सोळंके, जवरीलाल जाधव, विरु लाड यांनी पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात कबुतरी मैदान येथे धाव घेऊन तेथे संशयास्पद स्थितीत उभा असलेल्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचा कट्टा व एक जिवंत कडतुस सापडले. सदर तरुणाकडे कट्टा व काडतूस बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याने त्याला ताब्यात घेतले. देशी कट्टा, जिवंत कडतूस, एक मोबाइल एकूण २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अकोट शहर पोलिसांनी सदर युवकाविरुद्ध अवैध शस्र बाळगल्या प्रकरणी आर्म्स अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक कलासागर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके व गुन्हे शोध पथकाने केली.