राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 09:33 PM2021-01-12T21:33:10+5:302021-01-12T21:33:56+5:30
Suicide : दुपारी तीन वाजेच्या सुमारास राहूल याने घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली.
जळगाव : गेंदालाल मील भागातील राहूल उर्फ सचिन सिध्दार्थ गाढे (२०) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल याने मागील वर्षी बारावी उत्तीर्ण केली होती. मंगळवारी वडील सिध्दार्थ गाढे व भाऊ रोहीत कामाला गेले होते तर आई देखील बाहेर गेलेली होती.
दुपारी तीन वाजेच्या सुमारास राहूल याने घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने आई घरी आल्यानंतर मुलाने गळफास घेतल्याचे दिसले. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. दरम्यान, तरुण मुलाच्या या घटनेमुळे आई व वडीलांचा प्रचंड आक्रोश सुरु होता. दरम्यान, त्याने आत्महत्या का केली याचे कारण नातेवाईकांनाही सांगता आले नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास रवींद्र सोनार करीत आहेत.