नोकरी गेल्याने तरुणाची हॉटेलमध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 01:40 AM2020-07-05T01:40:59+5:302020-07-05T01:41:49+5:30

ठाण्यातील वागळे इस्टेट येथे आईवडिलांसह राहणारा विनोद हा एका मार्केटिंग कंपनीत नोकरी करत होता. लॉकडाऊनच्या काळात त्याची नोकरी गेल्यामुळे तो काही दिवसांपासून नैराश्यात होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबाने पोलिसांना दिली.

Young man commits suicide in hotel after losing his job | नोकरी गेल्याने तरुणाची हॉटेलमध्ये आत्महत्या

नोकरी गेल्याने तरुणाची हॉटेलमध्ये आत्महत्या

Next

ठाणे : लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याच्या नैराश्यातून विनोद गणेरी (२८) या तरुणाने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथे आईवडिलांसह राहणारा विनोद हा एका मार्केटिंग कंपनीत नोकरी करत होता. लॉकडाऊनच्या काळात त्याची नोकरी गेल्यामुळे तो काही दिवसांपासून नैराश्यात होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबाने पोलिसांना दिली. शुक्रवारी त्याने हॉटेल आयलँडमध्ये एक खोली बुक केली होती. रात्री उशिरा हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याच्या खोलीचे दार ठोठावले. खोलीतून कुठलाही प्रतिसाद येत नसल्याची बाब हॉटेल व्यवस्थापक यांना देण्यात आली. व्यवस्थापक यांनी बनावट चावीने दार उघडले असता विनोद हा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. ठाणे नगर पोलिसांनी विनोदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवला आहे.

हॉटेल मालकावर होणार गुन्हा दाखल
लॉकडाऊनमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल आयलँडच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली.

Web Title: Young man commits suicide in hotel after losing his job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.