वाढदिवसाची पार्टी, मित्रांसोबत जल्लोष; एक चूक भोवली अन् Birthday लाच मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 05:53 PM2022-11-13T17:53:44+5:302022-11-13T17:53:57+5:30
उत्तर प्रदेशातील शिवशंकरी धाममधील दीक्षितपूर गावात ही वेदनादायक घटना घडली आहे.
मिर्झापूर - वाढदिवसाची पार्टी. मित्रांसोबत सेलिब्रेशन. मग घरी परतण्याची तयारी. आनंद आणि उत्साहाने भरलेला दिवस पण त्यात एक चूक भोवली आणि आयुष्य संपले. ज्याच्या घरात मुलाच्या बर्थडे पार्टीची वाट पाहत होते, तिथे त्याचा मृतदेह पोहोचला. आनंदाच्या वातावरण शोक पसरला. एका चुकीनं हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं.
उत्तर प्रदेशातील शिवशंकरी धाममधील दीक्षितपूर गावात ही वेदनादायक घटना घडली आहे. वाढदिवसाची पार्टी करून घरी परतत असताना दीक्षितपूर ओव्हरब्रिज ओलांडताना एका टोकावरून दुसऱ्या टोकावर उडी मारताना हा अपघात झाला. ओव्हरब्रिजवरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. या घटनेने तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी स्टंटबाजीचा प्रकार कायम होत असे. या तरुणानेही स्टंट करण्याच्या नादात हा अपघात झाला.
मिर्झापूर जिल्ह्यातील अदलहाट पोलीस स्टेशन हद्दीतील पचेगडा राजपूर, दीक्षितपूर येथील रहिवासी जयरामचा मुलगा धर्मेंद्र कुमार, वय २०, शनिवारी वाढदिवसाची पार्टी साजरी करून घरी परतत होता. मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर धर्मेंद्र घरी परतण्यासाठी निघाला होता. त्याच्या मित्रांनी त्याला कॉलेजजवळ सोडलं. मित्र निघून गेल्यानंतर धर्मेंद्रने कॉलेजमधून सायकल घेण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिजवरील पलीकडे उडी मारली. दुभाजकाच्या मध्यभागी उडी मारताना विद्यार्थी धर्मेंद्रचा तोल गेला. त्या पुलावर न जाता तो खाली पडला. पुलाची उंची सुमारे ६० फूट असल्याने तो खाली पडून जागीच ठार झाला.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला
ओव्हरब्रिजवरून पडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी कुटुंबीयांना दिली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयही घटनास्थळी पोहोचले. धर्मेंद्र हा दोन भाऊ आणि एका बहिणीमध्ये सर्वात लहान होता. मोठा भाऊ जितेंद्र कुमार हा बाईक मेकॅनिक आहे. एक बहीण आहे. तिचे अजून लग्न झालेले नाही. वडील राजगीर मिस्त्री आहेत. पूल ओलांडताना खाली पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे असं पोलीस अधिकारी त्रिवेणी लाल सेन यांनी सांगितलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"