गैरवर्तन : पीडित बालिकेची साक्ष गाह्य धरुन तरुणाला पाच वर्ष कारावास  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 09:16 PM2019-12-24T21:16:27+5:302019-12-24T21:20:26+5:30

पीडित व तपाधिकारी वगळता सर्वच साक्षीदार फितूर झाले, मात्र पीडित बालिकेचीच साक्ष ग्राह्य धरुन आरोपीस सुनावली शिक्षा

Young man faces up to five years in prison | गैरवर्तन : पीडित बालिकेची साक्ष गाह्य धरुन तरुणाला पाच वर्ष कारावास  

गैरवर्तन : पीडित बालिकेची साक्ष गाह्य धरुन तरुणाला पाच वर्ष कारावास  

Next

जळगाव : बारा वर्षीय बालिकेचा तिच्या घरात जावून विनयभंग केल्याच्या प्रकरणात केवळ पीडित बालिकेचीच साक्ष ग्राह्य धरुन आरिफ युसुफ खाटीक (२५, रा.साकरे, ता.धरणगाव) या आरोपीला न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी मंगळवारी हा निकाल दिला.

पीडित बालिका १४ सप्टेबर २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता शाळेत जाण्यासाठी घराचा दरवाजा बंद करीत असताना आरिफ खाटीक हा पीडितेजवळ गेला व बाजारासाठी पिशवी मागितली. दरवाजा उघडून बालिका घरात गेली असता आरिफ तिच्यामागे गेला व तिच्याशी अश्लिल वर्तन केले. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर आरिफने तेथून पळ काढला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात कलम ३५४, ४५२ व पोक्सो कायदा कलम ७, ८ व ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासाधिकारी वगळता सर्व साक्षीदार फितूर
या खटल्याचे वैशिष्टे असे की, पीडित व तपाधिकारी वगळता सर्वच साक्षीदार फितूर झाले होते. सरकारतर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता ही आत्याकडे आलेली होती. त्यात आत्या, आई, पंच व इतर सर्व साक्षीदार फितूर झाले. सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी घटना सत्य असतानाही साक्षीदार फितूर झाले व भविष्यात असेच होत राहिले तर गुन्हा करणाऱ्याची हिंमत आणखी बळावेल. महिला व बालिकांचे संरक्षण व्हावे व कायद्याचा धाक तयार व्हावा यासाठी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी असा जोरदार युक्तिवाद अ‍ॅड.बोरसे यांनी केला. न्यायालयाने सरकारी वकीलांचा युक्तीवाद व पीडितेची साक्ष ग्राह्य धरुन आरोपीला पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी शालीग्राम पाटील व तुषार मिस्तरी तसेच केसवॉच पंकज पाटील यांची या खटल्यात मदत झाली.

Web Title: Young man faces up to five years in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.