ईस्टरची पार्टी करायला गेलेल्या तरुणाची सिगारेटच्या वादातून तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 20:20 IST2020-04-15T20:12:44+5:302020-04-15T20:20:01+5:30
मंगळवारी मध्यरात्री नायगाव येथे ही घटना घडली.

ईस्टरची पार्टी करायला गेलेल्या तरुणाची सिगारेटच्या वादातून तरुणाची हत्या
वसई - ईस्टरची पार्टी साजरी करायला गेलेल्या एका तरुणाला सिगारेटच्या वादातून झालेल्या भांडणातून आपला जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी मध्यरात्री नायगाव येथे ही घटना घडली.
चार्मन हेलेस (३६) ही महिला दिनेश पाटील (३०) याच्यासोबत नायगाव येथे राहत होती. मंगळवारी रात्री हे दोघे ईस्टरनिमित्त आयोजित पार्टी करण्यासाठी नायगावच्या विजय पार्क येथील बन्क हाऊसमध्ये आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. रात्री उशीरा दिनेश पाटील याचा कॅनेट रोझारियो (६४) याच्याशी सिगारेट पिण्यावरून वाद झाला. त्या वादाचे पर्यवसन भांडणात झाले आणि रोझारियो याने स्वयंपाकघरातील चाकू आणून दिनेशवर वार केले. त्यात दिनेशचा मृत्यू झाला. माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी कॅनेट रोझारियो याला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.