आईला वाचवण्यासाठी मुलाने वडिलांवर चाकूने केले २४ वार, नंतर स्वत:च पोलिसांना बोलवलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 10:19 AM2021-03-12T10:19:10+5:302021-03-12T10:19:28+5:30
एलेक्सकडे २०० अशा ऑडिओ क्लिप्स आहेत ज्यात एलेक्सचे वडील छोट्या छोट्या गोष्टींवरून फार जास्त आक्रामक आणि रागावलेले दिसत ऐकायला मिळतात.
इटलीतील एका तरूणाला आपल्या वडिलांची हत्या करण्यासाठी २० वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते. एलेक्स पोंपा नावाच्या तरूणाने मान्य केलं आहे की, त्याने त्याचे वडील ग्युसेपेवर किचनमधील चाकूने २४ वेळा हल्ला केला. एलेक्सने हे कृत्य केलं कारण तो त्याच्या आईला वडिलांच्या हिसेंपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता.
या केसच्या तपासातून समोर आले आहे की, ग्येसेपे अनेक वर्षांपासून आपल्या परिवाराचं मानसिक शोषण करत होता. खासकरून ही व्यक्ती आपल्या पत्नीला मानसिक रूपाने फार जास्त टॉर्चर करत होती. त्याला तिच्यावर खूप संशय होता. रिपोर्ट्सनुसार, ही व्यक्ती आपल्या पत्नी दिवसातून शेकडो वेळा फोन करत होता. तिच्यावर सतत लक्ष ठेवत होता. (हे पण वाचा : सैराट! पळून लग्न केलं म्हणून मेहुण्याने भावोजीचं शिर कापलं; बहिणही फासावर लटकलेली दिसली...)
एलेक्सकडे २०० अशा ऑडिओ क्लिप्स आहेत ज्यात एलेक्सचे वडील छोट्या छोट्या गोष्टींवरून फार जास्त आक्रामक आणि रागावलेले दिसत ऐकायला मिळतात. रिपोर्ट्सनुसार, एलेक्स आणि त्याच्या भावाने काकांना मेसेज करून मदत मागितली होती. या दोघांना वाटत होतं की, त्यांचे वडील आज पुन्हा आईला मारू शकतात आणि त्यामुळे दोघेही घाबरलेले होते. (हे पण वाचा : खळबळजनक! प्रियकराने लग्नास दिला नकार, तरूणीने त्याला फसवण्यासाठी केली स्वत:च्या बहिणीची हत्या....)
मात्र, काकांनी काहीही मदत केली नाही. आणि अखेर एलेक्सला ज्या गोष्टीची भीती होती तिच गोष्ट झाली. एलेक्सच्या वडिलांनी पाहिलं होतं की, पत्नीच्या खांद्यावर ऑफिसमधील एका कर्मचाऱ्यांने हात ठेवला होता. ज्यामुळे तो संतापला होता. तो घरी आला त्याने पत्नीच्या तोंडावर फोन फेकून मारला.
यानंतर तो पत्नीला मारण्यासाठी जात होता तेव्हाच एलेक्स मधे आला. यानंतर दोघांमध्ये वाद इतका वाढला की, एलेक्सने वडिलांवर २४ वेळा चाकूने वार केला. एलेक्सने नंतर स्वत: पोलिसांना बोलवलं आणि आपला गुन्हा स्वीकार केला. रिपोर्ट्सनुसार, त्याला २० वर्षांची सुनावली जाऊ शकते.