गवत कापण्याच्या वादातून गेला तरुणाचा बळी    

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 12:56 PM2020-09-10T12:56:18+5:302020-09-10T12:57:09+5:30

गवत कापण्याच्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.गेल्याच महिन्यात उपवडे येथेही गवताच्या चार पेंढ्यावरून एका  तरुणाचा असाच बळी गेला आहे. 

The young man Murdered in a grass cutting dispute | गवत कापण्याच्या वादातून गेला तरुणाचा बळी    

गवत कापण्याच्या वादातून गेला तरुणाचा बळी    

Next

कोल्हापूर - कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावरील कुरुकली (ता.करवीर) येथे भोगावती महाविद्यालयाच्या रस्त्यावर गवत कापण्याच्या वादातून धारदार कोयत्याने तरुणाचा खून झाला. किशोर साताप्पा पाटील (रा. कुरुकली ता. करवीर) असे मयताचे नाव आहे.गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
गवत कापण्याच्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.गेल्याच महिन्यात उपवडे येथेही गवताच्या चार पेंढ्यावरून एका  तरुणाचा असाच बळी गेला आहे. 
गुरुवारी घडलेल्या घटनेतील खूनी हल्ला करणारा संशयित किरण हिंदूराव पाटील (रा. कुरुकली, ता. करवीर) हा स्वत:हून इस्पुर्ली पोलिस ठाण्यात हजर झाला. संशयित किरण आणि मयत किशोर यांच्यात हत्ती गवत कापण्यावरुन वाद झाल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली. दोघेही कुरुकली गावचे आहेत. घटनास्थळावरील दृश्य थरकाप उडवणारे होते. मयत किशोर यांच्या मानेवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वर्मी घाव बसले असल्याने त्याचा मृतदेह रक्ताने माखला होता. घटनास्थळी करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर, हवालदार के.डी. माने यांच्यासह पोलिस दाखल झाले आहेत.

Web Title: The young man Murdered in a grass cutting dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.