पूर्वीच्या भांडणातून तरुणाच्या डोक्यात वार करुन कॅनॉलमध्ये फेकले; स्वारगेट येथील घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:45 PM2020-09-23T12:45:37+5:302020-09-23T12:47:38+5:30

पूर्वी झालेल्या भांडणातून मित्रांनी दारू पिण्यास बोलावून तरुणाच्या डोक्यात वार केले.

The young man from the previous quarrel was struck in the head and thrown into the canal; Incident at Swargate | पूर्वीच्या भांडणातून तरुणाच्या डोक्यात वार करुन कॅनॉलमध्ये फेकले; स्वारगेट येथील घटना  

पूर्वीच्या भांडणातून तरुणाच्या डोक्यात वार करुन कॅनॉलमध्ये फेकले; स्वारगेट येथील घटना  

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : पूर्वी झालेल्या भांडणातून मित्रांनी दारू पिण्यास बोलावून तरुणाच्या डोक्यात वार करुन त्याला कॅनॉलमध्ये फेकून देऊन खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेटपोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रेम ऊर्फ टकल्या परदेशी, ओंकार ऊर्फ पप्पू जोशी (दोघे रा. शिवदर्शन, पर्वती) आणि त्यांचा मित्र गोट्या अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़
याप्रकरणी शुभम प्रकाश रोकडे (वय २४,रा.शाहू वसाहत, पर्वती) याने फिर्याद दिली आहे. या तिघांनी मारुन टाकण्याच्या उद्देशाने शुभमला कॅनॉलमध्ये फेकल्यानंतर ते पळून गेले. सुदैवाने पाणी कमी असल्याने शुभम बाहेर आला व चालत लक्ष्मीनारायण चौकात आला.  तेथे एका बिल्डिंगच्या खाली तो रात्रभर बेशुद्ध पडला होता. सकाळी शुद्धीवर आल्याने एका माणसाच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ओंकार आणि शुभम यांच्यात रविवारी भांडणे झाली होती. त्यानंतर सोमवारी रात्री प्रेम याने शुभम याला फोन करुन ओंकार याच्या घरी बोलविले. तेथे ते दारु पित बसले. तेथे प्रेम याच्या ओळखीचा गोट्या आला. त्यानंतर त्यांना गुटखा खाण्याची तल्लफ झाली. मोटारसायकलवरुन स्वारगेटला येत असताना ते लघुशंकेसाठी कॅनॉल रोडला थांबले. तेथे प्रेम याने तु ओंकारबरोबर काल का भांडला. आता तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून शुभम याच्या डोक्यात दगडाने व चिनीमातीच्या टोकदार वस्तूने मारले. गोट्या याने त्यांच्याकडील हत्याराने वार करुन जखमी केले. त्यानंतर शुभम याला कॅनॉलच्या पाण्यात फेकून ते पळून गेले.
शुभम हा सकाळी शुद्धीवर आल्यावर एका माणसाच्या मदतीने त्याने घरच्याशी संपर्क साधला. त्याच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाइकवडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारती हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचा जबाब नोंदविला. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ स्वारगेट पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The young man from the previous quarrel was struck in the head and thrown into the canal; Incident at Swargate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.