“आम्ही दोघं बाजारात गेलो, तेव्हा घरात ‘ती’ एकटी असल्याचं पाहून...”; अल्पवयीन मुलीवर दोनदा बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 08:39 AM2021-05-15T08:39:07+5:302021-05-15T11:02:14+5:30
१२ मे रोजी पीडित तरूणी सण्डीला गावातील एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेली होती
हरदोई – उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष देऊन तिच्यावर २ वेळा बलात्कार केल्याची घटना घडली आहे. इतकचं नाही तर आरोपीने मित्राच्या मदतीने बलात्काराचा व्हिडीओही काढला. ही खळबळजनक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पीडित तरूणीला तपासणीसाठी हॉस्पिटलला पाठवलं आहे. या घटनेचा तपास करून पुढील कारवाई करू असं पोलिसांनी म्हटलं आहे.
हे प्रकरण सण्डीला परिसरातील आहे. पीडित तरूणीच्या वडिलांनी दाखल केलेल्या पोलीस तक्रारीत म्हटलंय की, सण्डीलाच्या कोतवाली भागात राहणाऱ्या हरिजन सराय रहिवासी बिरजेशने त्यांच्या १६ वर्षाच्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. त्यानंतर बिरजेशने माझ्या मुलीसोबत संपर्क बंद केला. बोलणं बंद झालं असं त्यांनी सांगितले आहे.
लग्नासाठी गेलेल्या मुलीसोबत शारिरीक संबंध
१२ मे रोजी पीडित तरूणी सण्डीला गावातील एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी बिरजेश आणि त्याच्याच परिसरात राहणारा त्याचा मित्र आशिषसोबत तिथे आधीच पोहचला होता. बिरजेशने माझ्या मुलीला बाथरूममध्ये घेऊन जाऊन तिथे तिचे कपडे फाडले आणि जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी आशिष मोबाईलमधून व्हिडीओ बनवत होता असा आरोप पीडित तरूणीच्या वडिलांनी केला आहे.
दुसऱ्यांदा घरात घुसून बलात्कार
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी १३ मे रोजी मी माझ्या पत्नीसह बाजारात सामान खरेदी करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा घरात माझी मुलगी एकटी असल्याचं पाहून दोघंही घरात घुसले. त्यानंतर पुन्हा बिरजेशने माझ्या मुलीवर बलात्कार केला आणि आशिषने मोबाईलवर व्हिडीओ बनवला. त्यानंतर मी जेव्हा घरी आलो तेव्हा मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रसंगाची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ मी पोलीस स्टेशनला धाव घेतल्याचं वडील म्हणाले. या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक अनिल कुमार यादव यांनी सांगितले की, सध्या या प्रकरणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरूणीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलला पाठवलं आहे. या प्रकरणाचा तपास करून त्या दोघांवर कारवाई करण्यात येईल. परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.