पोलीस हादरले! तरुणाने दोन मुलींवर फेकले ॲसिड; एकीची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 08:17 PM2021-12-14T20:17:22+5:302021-12-14T20:26:26+5:30

Acid Attack : दोन्ही बहिणींना पिलाना सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. मोठ्या बहिणीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याचवेळी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

The young man threw acid on two girls; one girl in serious condition | पोलीस हादरले! तरुणाने दोन मुलींवर फेकले ॲसिड; एकीची प्रकृती चिंताजनक

पोलीस हादरले! तरुणाने दोन मुलींवर फेकले ॲसिड; एकीची प्रकृती चिंताजनक

googlenewsNext

बागपत - उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे दोन मुस्लिम बहिणींवर ॲसिड टाकल्याची घटना घडली आहे. दोन्ही बहिणींना पिलाना सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. मोठ्या बहिणीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याचवेळी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलैनी पोलिस स्टेशन हद्दीतील रोशनगड गावात मंगळवारी सकाळी गावातील एका तरुणाने दोन मुस्लिम बहिणींवर ॲसिड फेकले. आरोपी तरुण अनेक दिवसांपासून मुलींची छेड काढत होता, असे सांगण्यात येत आहे. मंगळवारी घराबाहेर पडलेल्या बहिणींवर ॲसिड टाकून तरुण फरार झाला. दोन्ही बहिणींवर ॲसिड टाकल्यानंतर मोठ्या बहिणीची प्रकृती चिंताजनक आहे. उपचारासाठी पिलाना सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोन्ही बहिणींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी तरुण फरार
डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर मोठ्या बहिणीला जिल्हा रुग्णालयात नेण्यास रेफर करण्यात आले आहे. त्याचवेळी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली.

बागपतचे एसपी नीरज कुमार जदौन यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील रोशनगड गावात दोन मुलींवर ॲसिड फेकल्याची घटना समोर आली आहे. मुलींच्या वडिलांनी गावातील एका मुलावर आरोप केले आहेत. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

या घटनेने पोलीस हादरले
उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये ॲसिड हल्ल्याच्या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली आहे. एसपी बागपत यांच्या सूचनेनंतर एक टीम तयार करण्यात आली असून आरोपी तरुणाचा शोध सुरू आहे. तर मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा अधिकारी राजकमल यादव यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश कुमार यांना उपचारात कोणताही हलगर्जीपणा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गावागावात अ‍ॅसिडची विक्री होत आहे
ॲसिड मिळवणे कठीण नाही. खेड्यातील गल्ल्यांमध्ये ॲसिड सहज सापडते. भाज्यांप्रमाणेच काही लोक त्याचा व्यवसाय सायकली आणि गाड्यांवर करतात. २० रुपये लिटर दराने गावागावात पुरवठा केला जातो. विक्रेत्या तरुणाने सांगितले की, या ॲसिडचा वापर टॉयलेट साफ करण्यासाठी केला जातो. कमी किमतीमुळे गावकरी सहज खरेदी करतात.

 

Web Title: The young man threw acid on two girls; one girl in serious condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.