'त्या' युवकाची हत्या बंदुकीच्या गोळीने नव्हे तर चाकू भोसकल्याने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 06:59 PM2021-05-17T18:59:06+5:302021-05-17T18:59:46+5:30

Murder Case : आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी : मृतदेहावर चाकूचे आठ घाव

The young man was not killed by a bullet but by a knife | 'त्या' युवकाची हत्या बंदुकीच्या गोळीने नव्हे तर चाकू भोसकल्याने

'त्या' युवकाची हत्या बंदुकीच्या गोळीने नव्हे तर चाकू भोसकल्याने

Next
ठळक मुद्देआबिदची हत्या बंदुकीच्या गोळीने नव्हे तर धारदार चाकू भोसकल्याने झाल्याची बाब प्राथमिक वैद्यकीय अहवालातून पुढे आली असल्याची माहिती वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. निलेश पांडे यांनी ‘लोकमत’ला दिली.

चंद्रपूर : वरोरा शहरातील वर्दळीच्या ठिकाणी आबिद शेख या विवाहित तरूणाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. घटनास्थळी एक बंदुक आढळली होती. मात्र आबिदची हत्या बंदुकीच्या गोळीने नव्हे तर धारदार चाकू भोसकल्याने झाल्याची बाब प्राथमिक वैद्यकीय अहवालातून पुढे आली असल्याची माहिती वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. निलेश पांडे यांनी ‘लोकमत’ला दिली.

वरोरा शहरातील पंचायत समिती कार्यालयानजिक १५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास एका टिनाच्या शेडखाली आबिद शेख हा बसला असताना दुचाकी वाहनाने आलेल्या देवा नोकरकर व गौरव वाळके या दोघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. घटनास्थळी एक बंदुक आढळून आली. मात्र आबिदच्या मृतदेहावर धारदार शस्त्राचे आठ घाव आढळून आले. यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालातून दिसून येत असल्याचे उपिवभागीय अधिकारी डाॅ. निलेश पांडे यांचे म्हणणे आहे. यावरून मारेकऱ्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडल्या वा नाही ही बाब अद्याप स्पष्ट झाली नाही. या प्रकरणी पोलिसांनी देवा नोकरकर व गौरव वाळके या दोन्ही आरोपींना काही तासातच अटक केली. या दोघांनी आबिदची हत्या नेमकी कशासाठी केली, हे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. आरोपींना वरोरा न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकीरण मडावी हे पोलीस करीत आहेत.

Web Title: The young man was not killed by a bullet but by a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.