ऑनलाईन स्वस्तात मोबाईल घेणं तरुणाला पडलं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 06:30 PM2019-07-25T18:30:42+5:302019-07-25T18:32:36+5:30
मोबाईलऐवजी दोन बेल्ट आणि पत्त्याचे कॅट
कल्याण - ऑनलाईन मोबाईल विक्रीच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार कल्याणात समोर आला आहे. तरुणाने बुक केलेल्या मोबाईलच्या ऐवजी पार्सलमध्ये दोन बेल्ट आणि पत्त्याचे कट देवून तरूणाला गंडा घातला आहे.
कल्याण पश्चिम बारवे गाव परिसरात राहणाऱ्या त्रिलोकी पांडे या तरुणाला १२ जुलै रोजी त्यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने तुमचा नंबर लकी नंबर असून तुम्हाला ओप्पो चा मोबाईल स्वस्त दरात देण्यात येईल असे सांगितले. पांडे यांनी पहिल्यादा नकार दिला मात्र दुसऱ्यांदा फोन पाठवण्यास सांगितले. २४ जुलै रोजी पांडे यांना एक पार्सल पाठवले त्यांना या पार्सलमध्ये मोबाईल फोन असल्याचे सांगितले. मात्र त्या मोबदल्यात साडे चार हजार रुपये मागितले. पांडे याने त्यांना पैसे देत पार्सल ताब्यात घेतले .पांडे याने पार्सल उघडून पाहिले असता त्यांना धक्का बसला पार्सलमध्ये मोबाईलच्या ऐवजी दोन बेल्ट आणि पत्त्याचे कॅट होते. सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या पांडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.