प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने केली आत्महत्या

By नितीन पंडित | Published: September 13, 2022 06:44 PM2022-09-13T18:44:33+5:302022-09-13T18:45:23+5:30

याप्रकरणी मयत तरुणीच्या बहिणीने प्रियकरा विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

young woman committed suicide after her lover refused to marry her | प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने केली आत्महत्या

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने केली आत्महत्या

googlenewsNext

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी: प्रियकराने लग्नास नकार दिल्याने एका २३ वर्षीय तरुणीने घरातील छताच्या पंख्याला ओढणीने बांधून गळफास घेतल्याची खळबळ जनक घटना सोमवारी काल्हेर येथे घडली आहे. याप्रकरणी मयत तरुणीच्या बहिणीने प्रियकरा विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पूजा राजू गवळी वय २३ वर्ष असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर सिताराम उर्फ स्वप्निल गोविंद राहणार माजीवडा ठाणे असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. स्वप्निल व पूजा यांचा एकमेकांसोबत प्रेम संबंध होते. मात्र प्रियकर स्वप्निल याने पूजा सोबतच्या लग्नात नकार देत तुला काय करायचे आहे ते कर असे सांगितल्यानंतर पूजा हिने घरातील छताच्या पंख्याच्या हुकला ओढणी बांधून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या मृत्यूप्रकरणी मयत पूजा हिची बहीण ज्योती अमोल बोधडे यांनी नारपोली पोलीस ठाण्यात प्रियकर सिताराम उर्फ स्वप्निल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: young woman committed suicide after her lover refused to marry her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.