पॉक्सो कायद्यानुसार युवती दोषी, १० वर्षाची शिक्षा; पहिलीच घटना, काय आहे प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 01:29 PM2023-03-16T13:29:50+5:302023-03-16T13:31:13+5:30

इंदूर विशेष न्यायाधीशांनी आरोपी युवतीला १० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली

Young woman convicted under POCSO Act, 10 years imprisonment by indore court | पॉक्सो कायद्यानुसार युवती दोषी, १० वर्षाची शिक्षा; पहिलीच घटना, काय आहे प्रकार?

पॉक्सो कायद्यानुसार युवती दोषी, १० वर्षाची शिक्षा; पहिलीच घटना, काय आहे प्रकार?

googlenewsNext

इंदूर - मध्य प्रदेशातील इंदूर कोर्टाने एका मुलीला पॉक्सो कायद्यातंर्गत दोषी ठरवत तिला शिक्षा सुनावली आहे. पहिल्यांदाच पॉक्सो कायद्यानुसार एका युवतीला शिक्षा झाल्याची घटना आहे. अल्पवयीन मुलाचे शारिरीक शोषण केल्याचा आरोप तिच्यावर होता. आरोपी युवतीचं वय १९ वर्ष आहे. आरोपीने बहाण्याने मुलाला दुसऱ्या राज्यात नेले. इथं मुलाच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला परंतु काहीच हाती लागले नाही. 

कुटुंबानुसार, आमचा मुलगा खूप दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला परंतु कुठेच तो सापडला नाही. त्यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात धाव घेतली. बाणगंगा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. या बेपत्ता मुलाचा शोध घेऊन त्याला इंदूरला परत आणले गेले. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाचा जबाब नोंदवला. त्यात संपूर्ण घटनेचा खुलासा झाला. 
त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी युवतीला अटक केली. हे प्रकरण कोर्टात सुनावणीसाठी होते त्यावर बुधवारी कोर्टाने निर्णय घेतला. इंदूर विशेष न्यायाधीशांनी आरोपी युवतीला १० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अल्पवयीन मुलाच्या शारिरीक शोषणासाठी पहिल्यांदाच कोर्टाने एका युवतीला शिक्षा सुनावल्याची ही घटना आहे. 

नेमकं प्रकरण काय?
माहितीनुसार, अल्पवयीन मुलाला १९ वर्षीय मुलगी बहाण्याने फसवून त्याच्यासोबत घेऊन गेली होती. त्याठिकाणी तिने मुलाला कामाला लावले. या काळात मुलीने मुलाचं लैंगिक शोषण केले. तोपर्यंत कुटुंबाने मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांकडे दिली. पोलिसांनी तात्काळ एक्शन घेत मुलाचा शोध घेतला. त्यानंतर आरोपी युवतीला ताब्यात घेत कोर्टासमोर हजर केले. तिथे कोर्टाने मुलीविरोधात पुरावे पाहून तिला दोषी ठरवले. त्यानंतर आरोपी युवतीला १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 
 

Web Title: Young woman convicted under POCSO Act, 10 years imprisonment by indore court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.